भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक
हायकमांडकडून मार्गदर्शन : पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष नड्डा यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाची दोन दिवसीय बैठक शनिवार 27 जुलै रोजी देशाची राजधानी दिल्लीत सुरू झाली आहे. या बैठकीला भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशिवाय अन्य बडे नेते उपस्थित आहेत. या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा यांनी सर्व राज्यांचे अहवाल घेत त्यांना मार्गदर्शनही केले.
दिल्ली भाजप मुख्यालयात रालोआशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ही बैठक होणार आहे. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संघटनेचे प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये यावषी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्मयता आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी बैठक असल्यामुळे भाजपचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या कामाचा अहवाल हायकमांडला देणार आहेत. पक्षाने त्यांना एक फॉर्मेट दिला असून त्यामध्ये त्यांना आपल्या कार्यकाळातील कामगिरीच्या अचूक नोंदी करण्यास सांगितले आहे. तसेच ज्या योजना ते राबवू शकले नाहीत त्यांची यादीही मागितली आहे.
या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये भाजप अध्यक्ष आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना दिसत आहेत. या व्हिडिओत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही दिसत आहेत. गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधान मोदींच्या उजव्या बाजूला पहिल्या आसनावर बसलेले दिसतात. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आहेत.