मँडेरिन कॉलरची स्टाईल असेल तर लूक भारी दिसेल
03:57 PM Feb 27, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
Fashion Tips : तुम्ही वॉर्डरॉब अपडेट करायच्या विचारात असाल तर वैशिष्ट्यापूर्ण शर्टसची खरेदी करू शकता. त्यातही मँडरिन म्हणजेच बँड कॉलरचे शर्ट विकत घेता येतील. मँडरिन कॉलर ही पूर्व आशियाई देशांमधली स्टाईल आहे. पण यामुळे तुम्हाला हटके लूक मिळू शकतो. मँडरिन कॉलर शर्ट पॅरी करण्याच्या या काही टिप्स...
Advertisement
- सहकाऱ्यांसोबत संध्याकाळी बाहेर जाताना काय घालायचे असा प्रŽ पडला असेल तर मँडरिन कॉलर शर्ट हा बेस्ट ऑप्शन आहे. सौम्य रंगाचा मँडरिन शर्ट, ब्लेझर आणि मॅचिंग स्कीनी ट्राउझर हा मस्त पेहराव ठरू शकेल. त्यावर मॉक्केसिन शूज घालता येतील. या शर्टवर बंद गळा किंवा नेहऊ जॅकेटही घालता येईल. पण या शर्टवर टाय लावू नका.
- पॅज्युअल ऑकेजनसाठी गडद रंगाचा मँडरिन शर्ट निवडा. एखाद्या शॉर्टसवर हा शर्ट घाला. तुम्ही सस्पेंडर लूकही पॅरी करू शकता. त्यावर मस्तपैकी स्नीकर्स घाला आणि पॅज्युअल आउटिंगला तयार व्हा.
- ट्रॅडिशनल लूकसाठी मँडरिन कॉलरवाला कुर्ता ट्राय करा. चेक्स किंवा स्ट्राईप्सऐवजी हटके प्रिंट्सची निवड करा. या कुर्त्यासोबत स्कीनी जीन्सही घालता येईल. कोल्हापुरी चप्पलने तुम्हाला एथनिक लूक मिळेल.
Advertisement
Advertisement
Next Article