For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिकारीस गेलेल्याची झाली शिकार!

12:45 PM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिकारीस गेलेल्याची झाली शिकार
Advertisement

अडवई-सत्तरी येथील खळबळजनक प्रकार : तीन महिन्यांपूर्वी घडली होती अशीच घटना

Advertisement

वाळपई : रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाच्या जीवावर ही शिकार बेतली. अनवधानाने बंदुकीचा चाप ओढल्यामुळे अडवई येथील हेमंत हिरबा देसाई या तऊणाचे दुर्दैवी निधन होण्याची घटना गुऊवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी अभिजित नारायण देसाई या दोडामार्ग येथील युवकाला अटक केली आहे. या प्रकरणात विनापरवाना बंदूक, मयताला वाळपई दवाखान्यात नेण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी वाळपई पोलिसांनी जप्त केली आहे. हेमंत हिरबा देसाई याच्या मृतदेहावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकारामुळे अडवई भागाबरोबर सत्तरी तालुक्यामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. अवघ्या तीन महिन्यापूर्वी पाटवळ या ठिकाणी रानटी जनावरांची शिकार करताना समद खान या नाणूस येथील तऊणाचा अशाच प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला होता.

वाळपई पोलिसस्थानकाच्या वतीने डिचोलीचे पोलिस उपधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार हेरंब देसाई व अभिजीत देसाई हे दोघेही अडवई गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलामध्ये जनावरांची शिकार करण्यासाठी गेले होते. शिकारीची पूर्वतयारी करीत असतानाच अभिजीत देसाई याच्या हातामध्ये असलेल्या बंदुकीचा चाप अनवधानाने ओढला गेला व बंदुकीची गोळी सुटून समोर असलेल्या हेमंत हिरबा देसाई याच्या काळजाला लागली. गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच कोसळला. रक्तबंबाळ अवस्थेत हेमंत देसाई याला गावातील एका तऊणाशी संपर्क साधून दुचाकी घेऊन त्याला वाळपईच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. काळजाला गोळी लागल्यामुळे रक्तस्त्राव झाला व त्यातच त्याचे निधन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची तक्रार हेमंत देसाई यांच्या चुलत्याने वाळपई पोलिसस्थानकावर दाखल केली.

Advertisement

पोलिस घटनास्थळी दाखल 

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या संदर्भाची तक्रार दाखल झाल्यानंतर वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर, उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांनी बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पंचनामा करण्यात आला आहे. अभिजीत देसाई याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेण्यात आल्यानंतर वाळपई पोलिसांनी अभिजीत देसाई याला अटक केली. गुऊवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तपास करण्यात आल्यानंतर वाळपई पोलिसांनी सदर जागा सील केली. सदर ठिकाणी नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला. शुक्रवारी सकाळी जीवबा दळवी व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 12 वाजेपर्यंत सदर पथक घटनास्थळी पोहोचले. सदर ठिकाणी पडलेले रक्ताचा सडा व इतर स्वरूपाचे नमुने पथकाने गोळा केले. त्या संदर्भाची तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी पथकाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. शिकारीसाठी वापरण्यात आलेली बंदूक विनापरवाना असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयताला वाळपई इस्पितळात नेण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी, बंदुक इतर अनेक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अभिजित देसाई याच्यावर विनापरवाना बंदूक हाताळणे व रानटी जनावरांची शिकार करणे, वन्यप्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.