इसमाने स्वत:च्या घरालाच लावली आग
फायर ब्रिगेडला काम करताना पाहण्याची हौस
प्रत्येकाची पसंत-नापसंत होती, त्यानुसार माणूस कुठलेही कृत्य करतो, अनेक लोकांची हीच पसंत ध्यासात बदलते आणि मग हाच ध्यास माणसाला काहीही करण्यास भाग पाडतो. अलिकडेच एका व्यक्तीसोबत असेच घडले. ब्रिटनच्या या व्यक्तीला फायर ब्रिगेड पाहणे अत्यंत पसंत असल्याने स्वत:च्याच घराला आग लावली, ती देखील एका रात्रीत दोनवेळा. 26 वर्षीय जेम्स ब्राउन नॉर्थबरलँड येथील रहिवासी आहे, त्याला फायरफायटर्स पाहण्याचा छंद जडल्याने त्याने स्वत:च्या घरालाच आग लावली. जेम्स स्वत: देखली फायर फायटर होऊ इच्छित होता, परंतु ते त्याला शक्य झाले नाही, मग त्याने फायरफायटर पाहून स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात केली. अनेकदा त्याने कॉल करत फायर ब्रिगेडला बोलाविले होते.
तरीही त्याचे मन न भरल्याने स्वत:च्या घराला आग लावण्याचा निर्णय त्याने घेतला. यामुळे फायर ब्रिगेड त्याच्या घरी पोहोचली. एशिंग्टनच्या इलेवेंथ एव्हेन्यू भागात फायर ब्रिगेडला इमर्जन्सीत पाठविण्यात आले, एका घरात आग लागली होती, जी विझविण्याची जबाबदारी त्यांना सोपविण्यात आली, हे घर जेम्सचेच होते. वीजेच्या मीटरमधून स्पार्क येत होता, मग माझ्या कपड्यांनी पेट घेतला आणि आग पूर्ण घरात फैलावली असे त्याने सांगितले होते. फायर ब्रिगेडने आग विझविली आणि वीजेचे कनेक्शन तोडले. परंतु 90 मिनिटांनी जेम्सने पुन्हा फायर ब्रिगेडला फोन करत पुन्हा आग लागल्याचे कळविले.
12 महिन्यांमध्ये 80 वेळा कॉल
दुसऱ्यावेळी इसमाच्या बेड आणि काही अन्य गोष्टींमध्ये आग लागली होती, जे फायर ब्रिगेडने विझविली. यावेळी फायर फायटरनी आग लागण्याचे कारण विचारले असता त्याने काहीतरी कारण दिले. परंतु त्याचे कारण खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेम्स यावेळी चित्रिकरण करत होता आणि फायर ब्रिगेड आल्याने तो अत्यंत उत्साहित दिसून येत होता. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार जेम्सने 12 महिन्यांमध्ये 80 वेळा अग्निशमन दलाला फोन केला होता. न्यायालयाने त्याला जाळपोळ आणि जीवन धोक्यात आणल्याप्रकरणी आरोपी मानले. जेम्सला 8 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली, याचबरोबर त्याला 150 तासांच्या अनपेड लेबरची शिक्षा सुनावण्यात आली आहे.