अजब चेहऱ्यासह जन्मलेला इसम
26 वेळा करविली शस्त्रक्रिया
जगभरात असे अनेक आजार आहेत, ज्याविषयी कळल्यावर धक्का बसत असतो. यातील अनेक आजार अत्यंत दुर्लभ प्रकारचे असतात, ज्यांच्यावर उपचार शक्य नसतो. असाच एक उपचाररहित आजार इंग्लंडच्या बर्मिंघम येथे राहणाऱ्या 36 वर्षीय अमित घोषला आहे. तो अजब चेहऱ्यासोबत जन्माला आला होता. वयाच्या 11 व्या वर्षी त्याचा एक डोळा काढावा लागला. आतापर्यंत त्याने 26 शस्त्रक्रिया करविल्या आहेत. आपल्याला एकटेच जीवन जगावे लागेल असे त्याला वाटले होते. परंतु 2021 मध्ये पियाली नावाच्या महिलेने त्याच्यासोबत विवाह केला. दोघेही आता आनंदी जीवन जगत आहेत. परंतु अमितला आजही लोकांच्या कॉमेंट्सना सामोरे जावे लागते.
अमित हा न्यूरोफायब्रोमॅटोसिस टाइप 1 रोगासोबत जन्माला आला होता. या आजारात तंत्रिकांसोबत ट्यूमर विकसित होतो. हळूहळू त्याचा हा आजार वाढत गेला आणि वयाच्या 11 व्या वर्षी त्याचा डावा डोळा काढावा लागला. अमितला सवत:च्या नव्या चेहऱ्याला स्वीकार करण्यास मोठा संघर्ष करावा लागला. पूर्वी मी जगापासून लपून रहायचो, स्वत:ला कुरुप आणि अजब समजत होतो. परंतु काळासाब्sात मी स्वत:च्या या चेहऱ्यासोबत जीवन जगू लागलो. इतरांकडून स्वीकार करण्यापूर्वी मला स्वत.ला स्वीकारणे शिकावे लागेल असे अमित सांगतो.
स्वत:चा डोळा गमाविल्याच्या 25 वर्षांनी अमित आनंदी असल्याचे सांगत याचे श्रेय पत्नी पियालीला देतो. माझ्या पत्नीच्या प्रेमामुळे माझे जीवन पूर्णपणे बदलले आहे. मी अनेकदा चेहरा लपवायचो, परंतु पियालीमुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मी तुझ्या चेहऱ्याच्या एका हिस्स्याशी विवाह करणार नाही, मी तुझ्या पूर्ण चेहऱ्यासोबत विवाह करणार असल्याचे पियालीने मला सांगितले होते असे अमितने म्हटले आहे.
विचित्र नजरा, गैरसमज आणि ट्रोलिंग आजही अमितच्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा आहे. अलिकडेच अमितने ऑनलाइन एक व्हिडिओ शेअर केला आणि स्वत:च्या चेहऱ्यामुळे मिळणाऱ्या टीकात्मक लोकांच्या टिप्पणींविषयी सांगितले आहे. त्याच्या या व्हिडिओला जवळपास 3 कोटीवेळा पाहिले गेले आहे.
लोक अनेकदा माझ्याकडे विचित्रपणे बघत असतात. अनेक शालेय मुले माझ्याकडे येऊन माझा कृत्रिम डोळा हॅलोवीनचा मुखवटा आहे का अशी विचारणा करतात. तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर माझ्यावर अनेक आरोप केले जातात असे अमित सांगतो.