For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडिया विमानाच्या इंधन स्विचमध्ये बिघाड

06:24 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडिया विमानाच्या इंधन स्विचमध्ये बिघाड
Advertisement

लंडनमध्ये स्विच दोनदा डिस्कनेक्ट झाल्याचा पायलटचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून बेंगळूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात इंधन स्विचमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. ‘फ्लाइट एआय 132’च्या उड्डाणापूर्वी हा प्रकार पायलटच्या लक्षात आल्यानंतर तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी विमान तात्पुरते थांबविण्यात आले होते. इंजिन सुरू होताना विमानाचा इंधन नियंत्रण स्विच दोनदा डिस्कनेक्ट झाल्याचे पायलटने सांगितले. त्यानंतर, विमान ग्राउंडेड करण्यात आले. ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम) किंवा बोईंग कंपनी या बिघाडाच्या दुरुस्तीत सहभागी झाली होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

डीजीसीएच्या सूचनांनुसार, अलिकडेच सर्व विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचची तपासणी केली असतान कोणतीही समस्या आढळली नव्हती असे एअरलाइनने म्हटले आहे. गेल्यावर्षी 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात इंजिन सुरू करणाऱ्या इंधन नियंत्रण स्विचमध्ये समस्या आल्याचाही दावा अहवालात करण्यात आला आहे. विमानाच्या कॉकपिटमधील थ्रस्ट लीव्हर्सजवळ इंधन नियंत्रण स्विच असतात. ते इंजिनांना इंधन पुरवठा नियंत्रित करतात. प्रत्येक इंजिनमध्ये स्वतंत्र इंधन नियंत्रण स्विच असतो.

Advertisement
Tags :

.