For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

संजय राऊत यांना ‘सर्वोच्च’ दणका

06:36 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
संजय राऊत यांना ‘सर्वोच्च’ दणका
Advertisement

17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश : सरन्यायाधीश, न्यायालयाबद्दल टिप्पणी केल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शिवसेना-यूबीटी गटाचे खासदार संजय राऊत यांना 17 नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण भारताचे सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेबद्दल केलेल्या टिप्पणीशी संबंधित अवमान कार्यवाहीशी निगडित आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने पत्रकार निखिल वागळे यांनाही त्याच दिवशी व्हर्च्युअली न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात 16 ऑक्टोबर रोजी संजय राऊत आणि निखिल वागळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तथापि, न्यायालयाने प्रथम त्यांचे स्पष्टीकरण विचारात घेतले जाईल असे सांगून त्यांना पुढील सुनावणीत व्यक्तीश: हजर राहण्यापासून सूट दिली होती. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने दाखल केलेल्या अवमान याचिकेला अनुसरून या कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या.

Advertisement
Tags :

.