मेंदूतील विचार शब्दांद्वारे व्यक्त करणारे यंत्र
अध्यात्म किंवा दिव्यशक्तीच्या मदतीने इतरांच्या मनात नेमके काय चाललेय हे जाणून घेता येत असल्याचा दावा अनेक जण करत असतात. यात कितपत सत्य आहे हे सांगता येत नसले तरीही तंत्रज्ञान असे काही करू लागल्यास ते नाकारले जाऊ शकत नाही.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे नवनवे स्वरुप समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने मेंदूतील क्रिया जाणून घेण्याची पद्धत विकसित करण्यात आली होती. आता याला अधिक अत्याधुनिक स्वरुप देण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडनीच्या वैज्ञानिकांनी एक असे हेल्मेट तयार केले आहे, जे मेंदूत सुरू असलेल्या विचारांना जाणून घेत ब्रेन वेव्सना अनुवादित करते.
29 लोकांवर या नव्या उपकरणाचे परीक्षण करण्यात आले आहे. या लोकांवर सेंसरयुक्त हेल्मेट घालण्यास देण्यात आले होते. मग त्यांना मनात विचार करण्यास सांगण्यात आले, यादरम्यान एआय सेंसर त्यांच्या मेंदूच्या हालचालींवर नजर ठेवून होता. एआयद्वारे मेंदू तरुंगांना टेक्स्टमध्ये ट्रान्सलेट करण्यात आले आणि निष्कर्षांमध्ये 40-60 टक्क्यांपर्यंत अचूकता होती.
याचबरोबर एका व्यक्तीला मनातल्या मनात ‘गुड आफ्टरनून, आय होप यु आर डूइंग वेल. आय वुइल स्टार्ट विथ अ कॅफेचिनो, प्लीज, विथ अॅन एक्स्ट्रा शॉट ऑफ एस्प्रेसो’ असे म्हणायला सांगण्यात आले. या व्यक्तीने असे केल्यावर एआयने त्याच्या ब्रेन वेव्सना ‘आफ्टरनून, यु वेल? कॅफेचिनो, एक्स्ट्रा शॉट, एस्प्रेसो’ अशाप्रकारे ट्रान्सलेट केले होते.
डिस्क्रीट एन्कोडिंग तंत्रज्ञानाचा वापर
येथे डेवेव नावाच्या एआय मॉडेलमुळे एआय इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम (ईईजी) रिकॉर्डिंगला टेक्सटमध्ये ट्रान्सलेट करते. हे चॅटजीपीटी समवेत अन्य एआय प्रोग्राम्सचा वापर करते. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनीचे चिन-टेंग लिन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. हे संशोधन रॉय ईईजी वेव्सना थेट भाषेत अनुवादित करण्यास परिपूर्ण आहे. या क्षेत्रात हे मोठे यश आहे. हे न्यूट्रल डिकोडिंगच्या इनोव्हेटिव्ह अप्रोचसोबत ब्रेन टू टेक्स्ट ट्रान्सलेशनमध्ये डिस्क्रीट एन्कोडिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारे पहिलेच यंत्र असल्याचे लिन यांनी म्हटले आहे.
मे महिन्यात युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासने एक एआय मॉडेल विकसित केले हेते, जे मानवी विचार वाचू शकत होते, या एआय सिस्टीमला सिमेंटिक डिकोटर असे नाव देण्यात आले होते. परंतु हे हेल्मेट तंत्रज्ञान नवे आणि अधिक प्रभावी आहे.