अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
मंदिर परिसरात लांबच लांब रांगा
कोल्हापूर
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून श्री अंबाबाई मंदिरात लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनाच्या दर्शनाला रांगच रांग लागली आहे. शहर हाऊसफुल झाले आहे. श्री अंबाबाई मंदिरासोबतच जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. शहरातील अनेक रस्ते हाऊसफुल झाले आहेत.
गेल्या आठवड्याभरात सहा लाख भाविकांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले असून भाविकांच्या लांब लांब रांगा मंदिर परिसरात पाहायला मिळत आहेत. दरम्यान भाविकाला कोणत्याही व्यत्यायविना दर्शन मिळावं यासाठी देवस्थान समितीकडून अचूक बंदोबस्त करण्यात आला तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील मंदिर परिसरात ठेवण्यात आलेला आहे.
शहरातील यात्री निवास, हॉटेलस् मध्ये पुढच्या एक महिन्यांचे बुकींग फुल असल्याचीही माहीत मिळत आहे. म्हणजे नववर्षाच्या पहिल्या महिन्यातही कोल्हापूर शहरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचेही चर्चेत आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविक या थंडीच्या सिझनमध्ये कोल्हापूरला येण्याचा ओघ वाढला आहे.