For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रत्यक घराबाहेर उभी दिसते लँड रोव्हर

07:00 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रत्यक घराबाहेर उभी दिसते लँड रोव्हर
Advertisement

भारतातील अनोखे गाव, लोक टॅक्सीप्रमाणे करतात वापर

Advertisement

सद्यकाळात लँड रोव्हरचे नाव ऐकताच लोकांच्या मनात लक्झरी, रॉयल लाइफस्टाइल आणि कोट्यावधींची किंमत असलेल्या एसयूव्हीचे चित्र उभे राहते. ही जगातील सर्वात प्रीमियर कार कंपन्यांपैकी एक मानली जाते आणि याच्या वाहनातून प्रवास करणे प्रत्येकाचे स्वप्न असते. मोठे उद्योगपती, फिल्मस्टार आणि धनाढ्या लोक याला स्वत:च्या स्टेट्स सिंबलप्रमाणे बाळगतात. परंतु भारतात एक असे गाव आहे, जेथे याच लक्झरी कार्स कुठलाही छंद म्हणून नव्हे तर दैनंदिन टॅक्सीच्या रुपात वापरल्या जातात. येथे दशकांपेक्षा जुन्या लँड रोव्हर आजही पर्वतीय मार्गांवर मजबुतीने धावत असतात.

हे अनोखे ठिकाण मानेभंजन आहे. हे गाव पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेनजीक आहे. दार्जिलिंग शहरापासून याचे अंतर सुमारे 28 किलोमीटर आहे. पर्वतांदरम्यान वसलेले हे छोटेसे गाव स्वत:च्या सुंदर दऱ्याखोऱ्यांसोबत एका खास कारणामुळे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. लोक याला ‘लँड रोव्हरांचे गाव’ असेही म्हणतात. येथे पोहोचणारे पर्यटक सर्वप्रथम गावातील रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या लँड रोव्हर वाहनांना पाहून अवाक् होतात. अनेक वाहने 60-70 वर्षे जुनी आहेत. परंतु आजही कुठल्याही समस्येशिवाय ओबडधोबड रस्त्यांवर सहजपणे धावतात.

Advertisement

लँड रोव्हरची कहाणी

मानेभंजनमध्ये लँड रोव्हरचा इतिहास 1960 च्या दशकाशी जुळलेला असल्याचे मानले जाते. त्यावेळी ब्रिटिश चहामळ्यांचे मालक आणि अधिकाऱ्यांना पर्वतीय भागांमध्ये प्रवास करावा लागत होता. येथील रस्ते अत्यंत अरुंद, खडकाळ आणि उभ्या चढावाचे होते. अशा अवघड मार्गांवर सामान्य वाहने धावू शकत नव्हती. याचमुळे इंग्लंडमध्ये निर्मित लँड रोव्हर सीरिज-1 आणि त्यानंतरची मॉडेल्स येथे आणली गेली. या वाहनांची मजबूत बॉडी, दमदार इंजिन आणि कठिण मार्गावर धावण्याच्या क्षमतेने त्यांना लोकांची पहिली पसंत ठरविले. हळूहळू गावातील लोकांनी देखील याचा वापर सुरु केला.

कधीकाळी 300 हून अधिक लँड रोव्हर

स्थानिक लोकांनुसार एकेकाळी मानेभंजन गावात 300 हून अधिक लँड रोव्हर गाड्या धावत होत्या. काळासोबत त्यांची संख्या कमी झाली असली तरीही आजही अनेक जुनी वाहने रस्त्यांवर धावत आहेत. या वाहनांची देखभाल बाहेर होत नाही, तर गावातील मॅकेनिकच या वाहनांची दुरुस्ती करतात. अनेकदा याचे पार्ट्स सहजपणे मिळत नाहीत, याचमुळे लोक जुन्या पार्ट्सची दुरुस्ती करत किंवा स्वत: नवे पार्ट तयार करत त्यांना चालण्यायोग्य करतात.

टॅक्सीच्या रुपात वापर

मानेभंजन येथे येणारे पर्यटक नेहमीच या लँड रोव्हर वाहनांमध्ये बसून संदाकफू आणि आसपासच्या उंच पर्वतांचा प्रवास करतात. हा मार्ग इतका कठिण मानला जातो की येथे आजही याच मजबूत वाहनांना सर्वात विश्वसनीय मानले जाते. संदाकफूपासून स्वच्छ हवामानत कंचनजंघा आणि माउंट एव्हरेस्ट यासारख्या उंच हिमालयीन शिखरांचे आकर्षक दृश्य दिसून येते. याचमुळे दरवर्षी हजारो पर्यटक या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी येथे पोहोचत असतात.

संस्कृती देखील खास

मानेभंजन केवळ स्वत:च्या लँड रोव्हरसाठी ओळखले जात नाही. येथील नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि स्थानिक नेपाळी-बंगाली संस्कृतीही लोकांना खूप आकर्षित करते. येथे मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ आणि लोकांचा आपलेपणा पर्यटकांच्या प्रवासाला स्मरणीय करून सोडतो. मानेभंजन आजही वाहनांची ओळख त्यांची मजबुती आणि विश्वसनीयतेने होणाऱ्या काळाची आठवण करून देतो. येथील जुनी लँड रोव्हर केवळ वाहन नाही तर गावाचा वारसा अन् ओळख ठरली आहे.

Advertisement
Tags :

.