हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी : आप
पणजी : सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकरवर झालेल्या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी आपने केली आहे. काणकोणकरने या प्रकरणात मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांची नावे घेतल्याने खळबळ उडाली असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे. सरकारच्या नियंत्रणाखालील पोलीस याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे न्यायालयीन चौकशीच आवश्यक असल्याचे पालेकर यांनी म्हटले आहे. हा विषय आता केवळ एका व्यक्तिपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो गोव्याच्या लोकशाही आणि प्रशासकीय व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह बनला आहे. हा हल्ला प्रत्येक गोमंतकीयावर झालेला आहे. आज स्थानिक नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत असून त्याला येथील भ्रष्ट राजकीय व्यवस्था कारणीभूत आहे, असे पालेकर यांनी पुढे म्हटले आहे.