आरोंदा येथील जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
न्हावेली / वार्ताहर
आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आरोंदा संचलित आरोंदा हायस्कूल आरोंदा या माध्यमिक प्रशालेच्या वतीने मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .सदरील स्पर्धा आरोंदा हायस्कूलचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी व आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे हितचिंतक आदरणीय डॉ.पी. वाय. नाईक यांनी आपल्या सुविद्य पत्नी स्व. पुष्पा प्रभाकर नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रायोजित केली होती .सदरील स्पर्धा इयत्ता १ली ते ४ थी -प्रथम गट ,इयत्ता ५ वी ते ७ वी- द्वितीय गट व इयत्ता ८ वी ते १०वी- तृतीय गट अशा तीन गटात घेण्यात आली होती. प्रथम गटात ५५ विद्यार्थी ,द्वितीय गटात ८१ विद्यार्थी व तृतीय गटात ८१विद्यार्थ्यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी स्पर्धकांसोबत अनेक कलाशिक्षक, प्राथमिक ,माध्यमिक शिक्षक तसेच मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.
या स्पर्धेत पुढीलप्रमाणे गटनिहाय विद्यार्थी यशस्वी ठरले.गट क्रमांक १ - इयत्ता १ ते ४ थी प्रथम- कु . प्रार्थना प्रणय नाईक- स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव, सावंतवाडी, द्वितीय- यश प्रवीण सावंत- मदर क्वीन इंग्लिश मिडीयम स्कूल, सावंतवाडीतृतीय -कैवल्य सचिन नाईक-केंद्र शाळा वेतोरे नंबर १ उत्तेजनार्थ- रुजुल योगेश सातोसे- जि प प्रा शाळा पांडुरंग शेठ पडते, पडतेवाडी,कुडाळ गट क्रमांक २- इ. ५ वी ते ७ वी प्रथम -मोहित नीळकंठ सुतार -विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ,कणकवली द्वितीय -वर्षा भिकाजी नाईक- श्री जनता विद्यालय, तळवडे ,सावंतवाडीतृतीय- कु देवांग उमेश पेडणेकर- नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, सावंतवाडीउत्तेजनार्थ - रुद्रा चंदन गोसावी- मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव,सावंतवाडी गट क्रमांक ३- इ.८वी ते १० वी प्रथम- मानसी मिलेश मालजी- मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल,सावंतवाडी द्वितीय कु. श्रेया समीर चांदरकर - डॉ वराडकर हायस्कूलकट्टा,मालवण तृतीय- आयुष जितेश वेंगुर्लेकर-मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी उत्तेजनार्थ- राशी योगेश सातोसे इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ( कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ)तसेच दुपारी सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.त्यानंतर आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. सदरील बक्षिसे पारितोषिकांचे प्रायोजक डॉ. पी वाय नाईक साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.यावेळी विचारमंचावर संस्था अध्यक्ष संदेश परब, प्रशालेचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे, संस्था खजिनदार रुपेश धर्णे, सहसचिव अशोक धर्णे , संस्था सदस्य रामचंद्र कोरगावकर, सौ स्नेहा गडेकर, आनंद नाईक,सामाजिक कार्यकर्ते विद्याधर नाईक व मनोहर आरोंदेकर, प्रशालेचे कलाशिक्षक चंदन गोसावी, शाळेची माजी विद्यार्थिनी व एस पी के कॉलेजच्या प्राध्यापिका नीलम धुरी नाईक ग्रामपंचायत सदस्या मैथिली नाईक, शिल्पा नाईक व सौ साळगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.पी वाय नाईक म्हणाले," दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांना विविध कला गुणांच्या दर्शनासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे मोबाईलसारख्या माध्यमांमध्ये अडकलेले लक्ष काढून घेणे व शिक्षण आणि कलागुणांकडे वळवणे असा दुहेरी उद्देश या स्पर्धेतून साध्य होणार आहे, पुढील वर्षीही अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे"यावेळी संस्था अध्यक्ष संदेश परब यांनीही उपस्थित स्पर्धक ,कलाशिक्षक , पालक यांना धन्यवाद दिले व स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणानंतर सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्रीडाप्रकारांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी प्रमाणपत्र व गोल्ड,सिल्व्हर व ब्राँझ मेडल देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्रीकृष्ण गावडे यांनी केले आभार प्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका सौ कोरगावकर यांनी केले. सदरील कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले आहे .