आचरा - देऊळवाडी प्रभागात निलेश राणेंना उस्फुर्त प्रतिसाद
आचरा प्रतिनिधी
होऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीत आचरा विभागातून राणेंना नेहमीच एक नंबरचे मतदान देऊन नेहमीच राणेंना साथ देणाऱ्या आचरा देऊळवाडी प्रभागात शुक्रवारी महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचाराला आज सुरवात झाली. या प्रचाराला या भागातील मतदार राजाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला होता. राणेंना एक नंबरचे मतदान देऊळवाडी प्रभागातून देण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. राणेंच्या माध्यमातून या भागातील विकासकामाना गती मिळाली असल्याने आम्ही राणेंना विजयी करू असा विश्वास यावेळी नागरिक व्यक्त करत होते.यावेळी मालवण पंचायत समिती माजी सभापती नीलिमा सावंत,शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजू मिराशी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, अभिजित सावंत, मंगेश घाडी, अभय भोसले, उदय पुजारे, लऊ घाडी, नितीन भोसले, संदेश मेस्त्री, बंटी मेस्त्री, मंगेश मेस्त्री, भाऊ घाडी, बाळा गांवकर,शंकर घाडी, अनिकेत घाडी, अजित घाडी, रुपेश साटम, जितू घाडी आदी उपस्थित होते.