सिलिकॉनच्या बाहुल्यांनी भरलेले घर
देखभालीत व्यस्त असते महिला
मुलांसोबत खेळणे आणि त्यांची देखभाल करणे सर्वांनाच आवडत असते. विशेषकरून जेव्हा घरात मुलाचा जन्म होतो, तेव्हा आईची अनेक वर्षे त्याच्यासोबत अन् त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत व्यतित होत असतात. परंतु जेव्हा ही मुले मोठी होतात, तेव्हा अनेकदा त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालविता येत नाही. ऑस्ट्रेलियातील एका महिलेसोबत काहीसे असेच घडले आहे, ज्यानंतर तिने उचललेले पाऊल काहीसे अजबच आहे.
सिल्विया हेस्जेर्टेरेनियोवा ही सिडनीत राहणारी असून ती 5 मुलांची आई आडहे. परंतु सध्या ती स्वत:च्या 5 मुलांमुळे नव्हे तर ऑनलाइन खरेदी केलेल्या स्वर्तच्या 250 मुलांवरून चर्चेत आहे. तिचे घर आता याच मुलांनी भरून गेले आहे, तिचा पूर्ण दिवस याच मुलांसोबत जात असतो.
हसत-बोलत नाहीत
सिल्विया यांच्या मुली 31 वर्षीय वेरोनिका आणि 27 वर्षीय सोफियाने स्वत:च्या आईच्या वाढदिवशी त्यांना सिलिकॉनची मुलगी (एकप्रकारची बाहुली) गिफ्ट केली. ही बाहुली खऱ्याखुऱ्या मुलीप्रमाणे भासत होती. मी रिबॉर्न म्हणजेच सिलिकॉनच्या रियलिस्टिक डॉल्सविषयी वाचले होते, परंतु कधीच त्यांना पाहिले नव्हते. यानंतर ऑनलाईन इबेच्या साइटवरून स्वत:साठी आणखी रिबॉर्न डॉल्स ऑर्डर केल्या. यात जुळी मुले देखील सामील होती. माझे हे कलेक्शन हळूहळू वाढत गेल्याचे सिल्विया सांगतात.
निर्मिती सुरू केली
याचबरोबर सिल्विया यांनी हळूहळू स्वत: देखील डॉल्स निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांचे कलेक्शन आता 250 डॉल्सपर्यंत पोहोचले आहे. या डॉल्सच्या देखभालीत त्यांच्या मुली देखील मदत करतात. खऱ्या मुलांप्रमाणे सिल्विया या डॉल्सना अंघोळ घालतात, कपडे बदलतात आणि गाडीतून फिरायला घेऊन जातात. याचबरोबर कॅम्पिंग, हॉर्स रायडिंग, स्केटिंग आणि रेस्टॉरंटमध्ये देखील त्यांना सोबत नेतात. लोक आता या डॉल्सकरता ऑर्डर देत आहेत, कारण या डॉल्स मानसिक रुग्णांच्या थेरपीत सहाय्यभूत ठरतात असे सिल्विया यांनी सांगितले आहे.