For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरक्षेच्या नावाने प्रश्नच प्रश्न

06:48 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुरक्षेच्या नावाने प्रश्नच प्रश्न
Advertisement

मुंबई धावते, मुंबई जागी आहे, मुंबई कधीच थांबत नाही, असे आपण अभिमानाने म्हणतो. पण या धावत्या मुंबईत माणसाच्या जीवाची किंमत मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यु झालेला असतानाच,27 सप्टेंबर 2026 रोजी पहाटेच्या सुमारास  मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील एका सार्वजनिक शौचालयात विषारी रासायनिक वायूने गुदमरून दोन तऊणांचा दुर्दैवी मफत्यू झाला आहे. घटना वेगवेगळ्या असल्या तरी सातत्याने एकच प्रश्नच पडतो तो म्हणजे मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?

Advertisement

मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटले जाते, जसा इथे येणारा कधी उपाशी मरत नाही, असे जरी म्हटले जात असले तरी, पुढच्या क्षणी काय घडेल ते सांगता येत नाही, एका हिंदी चित्रपटातील गाण्याप्रमाणे “ये मुंबई शहर हादसों का शहर है” यहा जिंदगी हादसो का सफर है या ओळीप्रमाणे इथे जगावे लागते. मुंबईत सर्वात अधिक नाहक बळी हे येथील यंत्रणा, पालिका आणि इतर प्रशासनाच्या बेपर्वा आणि निष्काळजीपणामुळे गेले आहेत. कधी मेट्रोचा गर्डर पडून जागेवर मृत्यु तर कधी झाड पडून, तर कधी चेंबरमध्ये पडून मृत्यु या घटना मुंबईकरांना नवीन नाहीत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात विजेचा शॉक लागून तीन जणांचा नाहक बळी गेला, तर रविवारी मुंबईतील गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी रासायनिक वायूने गुदमऊन दोन तरूणांचा नाहक बळी गेला. आता या घटनेला जबाबदार कोण? ज्या लोकांचा बळी गेला त्यांची चुक काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. पुढील काही दिवस या घटनेवऊन पालिकेत सत्ताधारी विरूध्द विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतील, या राजकीय खेळात  खरा दोषी मात्र सापडणार नाही. मुंबईचा विकास जितक्या झपाट्याने होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात असताना, दुसरीकडे या सगळ्या गोष्टीमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सातत्याने उभा राहत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाईचा सपाटा लावायचा दोन चार जणांवर गुन्हे दाखल करायचे, दोघा-तिघांचे निलंबन करायचे. मात्र त्या त्या वेळी सुरक्षेच्या दुष्टीने घ्यावयाची खबरदारी आणि उपाययोजना याकडे दुर्लक्ष करायचे, प्रशासन असो किंवा इतर यंत्रणेतील अधिकारी चिरी-मिरी मिळत असल्याने लोकांच्या आयुष्याशी खेळतात, कोणाच्या ना कोणाच्या चुकांमुळे आज नाहक बळी जात आहेत. दुर्घटना घडल्यावर मात्र कोणाची गय केली जाणार नाही असे माध्यमांसमोर सांगायचे, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करायची हे इतकेच सरकार आणि प्रशासनाचे काम राहीले आहे. गेल्या काही दिवसातील राजकारणाचा बिघडलेला पोत बघता, कंत्राटदार असो, उद्योगपती असो किंवा आदिवासी आश्रमशाळा चालवणारा संचालक असो, यांचा प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष संबंध हा राजकारणाशी असतोच. त्यामुळे कोणाची भीती नसल्यानेच सुरक्षेच्या दुष्टीने जे नियम पाळायचे आहेत, त्याला ही मंडळी हरताळ फासताना दिसतात. कारण यासाठी देखील काही रक्कम खर्च करावी लागते. मुंबईसारख्या महानगरात रस्ते, पूल, इमारती, सार्वजनिक शौचालये, मंडप, विद्युत व्यवस्था आणि विविध नागरी सुविधांची नियमित सुरक्षा तपासणी ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया राहता कामा नये. दुर्घटना झाल्यानंतर पंचनामा, चौकशी आणि नुकसानभरपाईपेक्षा दुर्घटना होऊच नये यासाठीची यंत्रणा अधिक महत्त्वाची आहे. मुंबई शहर मफत्यूचा सापळा बनत आहे, मुंबईला सुरक्षित शहर बनवायचे असेल तर दुर्घटना होण्यापूर्वी धोका ओळखणारी व्यवस्था हवी. प्रत्येक मफत्यूमागे एक कुटुंब उद्ध्वस्त होते. एखाद्या आकडेवारीत दोन मफत्यू वाढले म्हणून प्रश्न संपत नाही. त्या दोन जीवांना वाचवता आले असते का? हा प्रश्नच शासन आणि प्रशासनासमोर सर्वात मोठा असला पाहिजे. दोन कुटुंबांच्या आयुष्याचा आधारच एका क्षणात हिरावला गेला आहे. प्रभाकर धनिवर (24) आणि भाविन देसाई (18) या दोघांचे वय बघता, त्यांच्या आई-वडिलांच्या आशा, आकांक्षा  उद्याच्या आयुष्याची खात्रीच हिरावून गेली. कोणी तरी गावावऊन येतो रिक्षातून प्रवास करतो त्या रिक्षावर मेट्रोचा गर्डर पडतो आणि त्याचा जागीच मृत्यु होतो, अशा अनेक घटना या रोज मुंबईत घडत असतात, ज्यामध्ये नाहक कोणाचा तरी बळी जात असतो. काही घटना या माणसाच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे घडत असतात, ज्या माणसाच्या हातात असतात त्यात जर योग्य खबरदारी घेतली तर या घटना टाळता येतात. गेल्या आठवड्यात कोस्टल रोडच्या पुलावऊन कोसळलेली बीएमडब्लू कार, त्यामध्ये तीन तरूणांचा गेलेला बळी, योग्य खबरदारी घेतली असती तर ही घटना टाळता आली असती. दुसरीकडे काही घटनांना प्रशासन आणि यंत्रणा जबाबदार असते, गोरेगावची दुर्घटना असो काळाचौकी गणपती मंडळाच्या मंडपात शॉक लागून झालेल्या दोघांचा मृत्यु तर जोगेश्वरी येथे गणपती विसर्जनाच्या वेळी कृत्रिम तलावात विजेचा प्रवाह उतरल्याने 19 वर्षीय तरूणाचा झालेला मृत्यु, या घटनांचा विचार करता या मफत्यूमागचं नेमकं कारण समोर आलं पाहिजे, जबाबदार कोण हे निश्चित झालं पाहिजे आणि दोषी आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र गेल्या काही वर्षातील राजकारण बघता प्रत्येक राजकीय पक्ष, नेते यांच्याशी हितसंबंध असल्याने ना कोणाला शिक्षा होत आहे, ना कोणाला दंड, ना दोषारोपाची जबाबदारी स्पष्ट, अशा घटना घडल्यानंतर संबंधित कंत्राटदार, ठेकेदार हा कोणत्या नेत्याच्या किती जवळचा आहे, कोणाची किती भागीदारी आहे, हेच दाखवण्याची स्पर्धा दिसून येते. त्यामुळे या नेत्यांच्या राजकारणात मुळ प्रश्नच समोर येत नाही, शेवटी मुंबईकरांना देवाच्या दर्शनाला गेला तरी धोका आणि शौचालयाला गेला तरी धोका, त्यामुळे मुंबईकरांना जीव मुठीत धऊनच जगायचं हाच नियम अनुसरावा लागतो.

प्रवीण काळे

Advertisement

Advertisement
Tags :

.