For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुताटकीयुक्त सामग्री बाळगण्याचा छंद

06:15 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
भुताटकीयुक्त सामग्री बाळगण्याचा छंद
Advertisement

घरात आहेत 54 हॉन्टेड डॉल्स

Advertisement

भूत-प्रेत असतात की नाही या प्रश्नाचे उत्तर माणसाच्या स्वत:च्या बुद्धी अन् अनुभवावर निर्भर असते. आपण भूत पाहिल्याचा दावा अनेकदा लोक कर असतात. आता अमेरिकेतील एका महिलेने स्वत:कडे 54 भुताटकीयुक्त बाहुल्या असून त्या अत्यंत खोडकर असल्याचा दावा केला आहे. माझ्या घरात राहणाऱ्या अनेक भुताटकीयुक्त बाहुल्या नाताळाच्या काळात अधिकच मस्तीखोर होतात असे तिचे सांगणे आहे.

Advertisement

या महिलेचे नाव टीज असून ती अमेरिकेत राहणारी एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आणि हॉन्टेड आयटम्सची संग्राहिका आहे. मागील 5 वर्षांमध्ये टीजने भीतीदायक आणि रहस्यमय वस्तूंचा एक मोठा संग्रह तयार केला आहे. तिच्याकडे एकूण 54 हॉन्टेड डॉल्स आहेत, ज्यांच्यासाठी तिने घरात एक वेगळा कक्षच तयार केला आहे. सर्वसाधारण दिवसांमध्येही या डॉल्स अजब हालचाली करत असतात. कधी लाइट्स आपोआप पेटविल्या जातात, कधी फ्रीजचे डोअर खुले दिसून येते. अनेकदा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आपोआप सुरू होतात असा दावा तिने केला आहे. या बाहुल्या स्वत:च्या पसंतीची गाणीही वाजवून घेतात, परंतु नाताळ येताच त्यांच्या हालचालींचा स्तर आणखी वाढत असल्याचे तिचे सांगणे आहे.

टीजनुसार सणादरम्यान घरात ठेवण्यात आलेली सजावट रात्री रहस्यमय पद्धतीने बदलून जाते आणि गोष्टी स्वत:च्या जागेवरून सरकलेल्या आढळून येतात. नाताळाशी निगडित हा क्षण माझ्यासाठी भीतीदायक असण्यासोबत मजेशीरही असतो. बाहुल्यांच्या खोलीत सजावट म्हणून छोट्या छोट्या क्रिसमस स्टॉकिंग्स टांगल्या होत्या. प्रत्येकवेळी मी जेव्हा वळून पाहते, तेव्हा स्टॉकिंग्स खाली पडलेल्या आढळून आल्या. डिसेंबरभर हेच चालत राहिले, मी त्यांना पुन्हा टांगून देते आणि मग त्या पुन्हा खाली पडलेल्या असतात असे टीजचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.