For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पती-पत्नीच्या हाणामारीत ऐतिहासिक बाल्कनी तुटली

07:00 AM Feb 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
पती पत्नीच्या हाणामारीत ऐतिहासिक बाल्कनी तुटली
Advertisement

जोडपं खाली आपटलं, आता खटला चालणार

Advertisement

आपल्याकडे पती-पत्नीचे भांडण कशावरून होईल याचा नेम नाही. या भांडणानंतर रुसवा-फुगव्यात बराच वेळ जातो. पण हे भांडण हाणामारीपर्यंत पोहोचण्याचा एक प्रकार रशियामध्ये घडला आहे. पती-पत्नीच्या भांडणात चक्क बाल्कनी तुटली आणि हे जोडपं दुसऱया मजल्यावरून थेट जमिनीवर पडले आहे. तब्बल 25 फूट उंचीवरून पडल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हो आहे. तर ज्या बाल्कनीचे नुकसान झाले आहे ती 1833 साली बांधलेल्या ऐतिहासिक इमारतीची असल्याने या जोडप्यावर आता खटला चालविला जाणार आहे.

35 वर्षीय ओल्गा वोल्कोवा आणि एव्हगेनी कार्लागिन हे जोडपं रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये राहते. त्यांच्याच एका गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि काही वेळातच याचे रुपांतर हाणामारीत झाले. भांडत असताना ते दुसऱया मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीत आले आणि थेट खाली पडले.

Advertisement

या जोडप्याचे घर अगदी रस्त्याच्या कडेला आहे. रस्त्यावरून जाणाऱया एका व्यक्तीने त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ स्वतःच्या कॅमेऱयात कैद केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे जोडपं बाल्कनीची रेलिंग तोडून 25 फूट खाली रस्त्यावर कसे पडले हे या व्हिडिओत दिसून येते.

दोघेही खाली पडल्यावर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. या दोघांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरीही दोघांचे दोन्ही हात आणि पाय प्रॅक्चर झाले आहेत. या जोडप्याला एक मुलगा आहे. पती-पत्नीमध्ये वाद नेमका कशामुळे सुरू होता हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. परंतु वादाचं रुपांतर हाणामारीत होत थेट बाल्कनी मोडेपर्यंत ते पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे सेंट पीटर्सबर्ग प्रशासन आता या इमारतीची बाल्कनी दुरुस्तीयोग्य आहे की नाही हे पाहणार आहे. संबंधित जोडप्याच्या विरोधात याप्रकरणी खटला दाखल केला जाण्याची शक्यता आहे. ही इमारत ऐतिहासिक असून ती 1833 साली निर्माण करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.