For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमधील अत्यंत धोकादायक ठिकाण

06:30 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमधील अत्यंत धोकादायक ठिकाण
Advertisement

तुम्ही समुद्रकिनारी फिरत आहात, चहुबाजूला वाळू पसरलेली आहे, पाहण्यास सर्वकाही शांत अन् सुंदर वाटते, परंतु अचानक तुमचे पाय मातीत रुतल्यास, जेथून बाहेर पडणे अवघड ठरल्यास आणि तुम्ही स्वत:ला सावरण्यापूर्वीच समुद्राचे पाणी वेगाने तुमच्या दिशेने सरकू लागल्यास काय कराल?

Advertisement

ब्रिटनमध्ये अशी ठिकाणे आहेत, जेथे सुंदर दृश्य दिसता दिसता जीवघेणे ठरू शकते. येथील समुद्राचे पाणी इतक्या वेगाने परतते की माणूस त्याच्यासमोर धावूही शकत नाही. काही ठिकाणी पाय दलदलीत अडकतात, तर काही क्विकसँड म्हणजेच दलदलयुक्त वाळू तुम्हाला खाली खेचू शकते. या धोकादायक ठिकाणांमध्ये द ब्रूमवे आणि मोरेकॅम्बे बे खास स्वरुपात चर्चेत राहतात. दोन्ही ठिकाणी किंचित चूक महागात पडू शकते.

समुद्रामधून जातो मार्ग

Advertisement

ब्रिटनच्या एसेक्स किनाऱ्यावर रिव्हर क्राउच आणि रिव्हर टेम्सदरम्यान एक असा मार्ग आहे, ज्याला पाहून हा पायी चालण्याचा मार्ग असल्याचा विश्वासच बसत नाही. याचे नाव द ब्रूमवे आहे. हा मागं वेकेरिंग स्टेयर्सपासून सुरू होतो आणि थेट समुद्राच्या दिशेने जातो. काही अंतरापर्यंत पाण्याने वेढलेल्या भागात गेल्यावर हा सुमारे तीन मैलापर्यंत समुद्राच्या मधून जातो आणि मग फाउलनेस नावाच्या दलदलयुक्त बेटाच्या किनारी बाहेर पडतो. याचमुळे याला ब्रिटनच्या सर्वात धोकादायक पायी मार्गांपैकी एक मानले जाते.

100 हून अधिक जणांचा मृत्यू

ब्रूमवेची सर्वात भीतीदायक गोष्ट याचा इतिहास आहे. शतकांदरम्यान या मार्गाने 100 हून अधिक लोकांचा जीव घेतल्याचे सांगण्यात येते. यातील 66 लोकांना फाउलनेसच्या छोट्याशा चर्चयार्डमध्ये दफन करण्यात आले आहेत, तर उर्वरितांचे मृतदेह कधीच हाती लागले नाहीत. याचमुळे जुन्या काळातील वृत्तपत्रांनी याला एक भयावह नावही दिले होते, याला डूमवे देखील म्हटले जाते. परंतु या मार्गावर धोका केवळ समुद्राच्या पाण्याचा नाही

वाळू पाहून फसू नका

समुद्राचे पाणी मागे हटल्यावर येथे अनेक किलोमीटरपर्यंत फैलावलेली वाळू दिसून येते. ही वाळू इतकी मजबूत असू शकते की त्यावर माणूस सहजपणे चालू शकेल. परंतु भरती परत आल्यावर समुद्राचे पाणी अत्यंत वेगाने परतते, पाण्याचा वेग माणसाच्या धावण्याच्या वेगापेक्षाही अधिक असू शकतो. म्हणजेच एखादा व्यक्ती चुकीच्या वेळी मार्गात अडकला, तर त्याच्याकडे सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी अत्यंत कमी वेळ राहतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे चहुबाजूला एकसारखी वाळू दिसते, धुके, पावसात मार्ग ओळखणे अत्यंत अवघड ठरू शकते.

माती पकडते पाय

ब्रूमवेर सर्व ठिकाणी जमीन सागरी नाही, काही हिस्से कठोर वाळूचे आहेत, तर काही ठिकाणी ओली माती आणि दलदल मिळू शकते, ज्यात पाय अडकून पडतात. काही ठिकाणी क्विकसँड म्हणजेच दलदलयुक्त वाळूही धोका निर्माण करते. अशास्थितीत एक चुकीचे पाऊल माणसासाठी जीवघेणे ठरू शकते. याचमुळे साफ हवामानात हे ठिकाणी मोठ्या समुद्र किनाऱ्यासारखे सुंदर वाटू शकते, परंतु हवामान बिघडताच याचे पूर्ण रुप बदलून जाते.

फाउलनेस हे काही सामान्य पर्यटनस्थळ नाही. पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने हे बेट खरेदी केले होते. यानंतर तेथे सैन्य घडामोडी घडत राहिल्या आहेत. समुद्राच्या बाजूला फायरिंग टेस्ट करण्यात येतात. यामुळे आता हे एक अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक भाग ठरले आहे.

Advertisement
Tags :

.