महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हलगाजवळ भरधाव ट्रकने बकऱ्यांच्या कळपाला चिरडले

11:15 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

22 बकऱ्या जागीच ठार : अनेक जखमी

Advertisement

बेळगाव : भरधाव ट्रक बकऱ्यांच्या कळपावरून गेल्याने 22 बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 15 बकरी जखमी झाली आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथील मंजुनाथ राईस मिलजवळ रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अंमलझरी, ता. चिकोडी येथील मेंढपाळ रामा बिराप्पा पुजेरी यांच्या मालकीच्या त्या बकऱ्या आहेत. धारवाडहून बेळगावकडे येणाऱ्या महामार्गावर ही घटना घडली आहे. रामा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात टीएन 88, यु 8807 क्रमांकाच्या ट्रकचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालकाने ट्रकसह तेथून पलायन केले आहे. रामा पुजेरी यांनी आपल्या मालकीची बकरी चारण्यासाठी हलगा परिसरात नेली होती. सर्व्हिस रोडवरून जाताना सर्व्हिस रोडवरून बकऱ्यांचा कळप जात होता. त्यावेळी तेथे असलेली भटकी कुत्री त्यांच्या अंगावर धावून गेल्याने या कुत्र्यांना घाबरून कळपातील काही बकऱ्या महामार्गावर शिरल्या. त्याचवेळी सुसाट वेगाने येणारा ट्रक या बकऱ्यांवरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात चिकोडी तालुक्यातील मेंढपाळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article