Kolhapur News : शियेतील धाकोबाचा दरा परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन
शियेत सात गव्यांच्या कळपाचे दर्शन
शिये : शिये (ता. करवीर) येथील धाकोबाचा दरा परिसरात शेतकऱ्यांना शनिवारी साडेचार वाजता एका गव्याचे तर साडेसहाच्या सुमारास सुमारे सात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले.
-सादळे मादळे डोंगराच्या दक्षिणेकडेपायथ्याला असलेल्या दरा येथील शेतामध्ये राऊत कुटुंबीय नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्याकडे गेले होते. त्यावेळी साडेचारच्या सुमारास महेश राऊत व त्यांचा मुलगा कार्तिक राऊत यांना एका गव्याचे दर्शन झाले. त्यांनी त्या गव्याचे फोटो व मोबाईलवर चित्रीकरण केले.
तर कार्तिक राऊत यांचे आजोबा निवृत्ती राऊत हे साडेसहाच्या सुमारास घरी येत असताना त्यांना सात गव्यांचा कळप दिसला. याबाबतची माहिती राऊत कुटुंबीयांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर शियेचे वनरक्षक विकास घोलप यांनी रेस्क्यू टीमला पाचरण करून ड्रोनच्या सहाय्याने हा गव्याचा कळप त्यांच्या आधिवासात घालवणार आहे. तरी या परिसरातील शेतकऱ्यांनी शेताकडे येताना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.