बेवारस आजारी वृद्धाला रुग्णालयात केले दाखल
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानसह पोलिसांची तप्तरता
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील स्टेट बँक नजीक आजारी अवस्थेत आढळलेल्या एका बेवारस वृद्धाला सामाजिक बांधिलकी संघटनेने पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँकेच्या आवारात नाकामध्ये ट्यूब असलेल्या अवस्थेत एक आजारी वृद्ध निदर्शनास आला. पोलीस कर्मचारी अंजली पवार यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना संपर्क साधला असता जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर आजारी वृद्धाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. सदर वृद्धाची ओळख पटली नसून कोणालाही माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन अथवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, पोलीस कर्मचारी अंजली पवार, भूषण भोवर, सुनील आंबेकर, अनिश बिजली, रुग्णवाहिका चालक सचिन राणे यांचे मदत कार्य लाभले.