बांदा फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप तर्फे मैत्रिणीला मदतीचा हात
प्रतिनिधी
बांदा
बांदा येथील खेमराज प्रशालेच्या 1985 दहावी वर्गाच्या फ्रेंड्स फॉरेवर या ग्रुपने आपल्या मैत्रिणीला मदतीचा हात देऊन आदर्श उपक्रम केला आहे .या ग्रुपमधील सुरेखा सुदन वाळके हिला स्वयंरोजगारासाठी या बॅचतर्फे घरघंटी प्रदान करण्यात आली .दरवर्षी या बॅच तर्फे गेट-टुगेदरचा कार्यक्रम केला जातो. त्यातून मित्र-मैत्रिणींचा संपर्क वाढतो तसेच वैचारिक आदानप्रदान होते. या बॅचच्या सदस्या सुरेखा सुदन येडवे- वाळके यांचे पती सुदन वाळके यांचे नुकतेच दुःखद निधन झाले . या कुटुंबाला स्वयंरोजगारासाठी सहाय्य करण्याचा निर्णय फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप तर्फे घेण्यात आला. त्यानुसार रविवारी सुरेखा वाळके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घरघंटी तसेच या व्यवसायासाठी सुरुवातीला लागणारी रक्कम सुरेखा वाळके आणि तिची मुलगी दिशा वाळके यांच्याकडे प्रदान करण्यात आली. यावेळी फिरोज खान ,दया आळवे, भानुदास दळवी, शितल राऊळ, साधना पांगम ,संगीता सावंत ,शुभा घाटे ,अजय महाजन, सुधीर शिरसाट, सागर हरमलकर आदी सदस्य उपस्थित होते. फ्रेंड्स फोरेवर ग्रुपच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे