For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पिरनवाडी येथे शिवाजी महाराज चौकात अवजड वाहनाची कारला धडक

10:23 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिरनवाडी येथे शिवाजी महाराज चौकात अवजड वाहनाची कारला धडक

वार्ताहर /मजगाव

Advertisement

पिरनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी सकाळी 11 वा. अवजड वाहन (केए 22 डी 3062) या 16 चाकी ट्रकने चारचाकी कार (केए 22 एमडी 6358) ला धडक दिल्याने कारचे नुकसान झाले आहे. मात्र ट्रक सावकाश जात असल्याने प्राणहानी टळली आहे. नित्याप्रमाणे सकाळी 7 ते 11 अवजड वाहनांना ‘नो इंट्री’ असल्याने सदर ट्रक 11 वाजण्याच्या प्रतीक्षेत होता. 11 वाजता वाहतूक नियत्रंण पोलिसांनी ‘नो इंट्री’ खुला केल्यानंतर एकामागून एक ट्रक शहरात जाण्यासाठी घाई करत असताना डाव्या बाजूने जाणाऱ्या कारगाडीला ठोकरल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. लागलीच उपस्थित पोलिसांनी थोड्या वेळात वाहतुकीला रस्ता खुला करून दिला. सदर कारमध्ये महिला व लहान बाळ होते. सुदैवानेच कोणालाही दु:खापत झाली नाही. नो इंट्रीवेळी अवजड वाहने पूर्वीप्रमाणे मच्छे गावच्या पलिकडे थांबवावीत आणि नो इंट्री खोलल्यानंतर सावकाश दोन-दोन गाड्या सोडाव्यात. तरच अपघात टळतील, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. अपघातग्रस्त वाहनांचा पोलिसांनी पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली होती.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.