Mumbai Bengaluru Highway | हायवेवरचा काळजाचा ठोका चुकला! शिरोलीत सहापदरीकरणाच्या खड्ड्यात टेम्पो झाला गायब अन्...
शिरोलीत १० फूट खोल खड्ड्यात मालवाहू टेम्पो कोसळला
पुलाची शिरोली : मुंबईहुन बेंगळूरला जाणारा मालवाहू टेम्पो सहापदरीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या दहा फूट खोल खड्यात कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र टेम्पो आणि त्यामध्ये असणाऱ्या सामानाचे मोठे नुकसान झाले.
पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मेनन पिस्टन समोर बुधवारी सकाळीसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुंबईहून बंगळूरला घर शिफ्टिंगचे सामान घेऊन जाणारा मालवाहू टेम्पो अचानक या खड्डयात कोसळला. चालकानेच टेम्पोतून बाहेर येत मालकाला कॉल केला. मालकाने शिरोली परिसरातील एका ट्रान्सपोर्ट चालकाशी संपर्क साधला त्यानंतर ही घटना निदर्शनास आली. दोन क्रेनच्या साह्याने हा टेम्पो बाहेर काढण्यात आला. मात्र या दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली.