For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : साताऱ्यात पतंगाच्या मांज्यामुळे घारी जखमी, पर्यावरणप्रेमींनी केली मदत

04:31 PM Feb 05, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   साताऱ्यात पतंगाच्या मांज्यामुळे घारी जखमी  पर्यावरणप्रेमींनी केली मदत
Advertisement

                              पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या घारीस नवजीवन

Advertisement

सातारा : पतंगाच्या मांज्यामुळे पंखाला गंभीर जखम झालेल्या एका घारीस वेळेवर मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले. दि. ३० जानेवारी रोजी पागा तालीम परिसरात ही घार जखमी अवस्थेत आढळून आली होती. पतंगाच्या धारदार मांज्यामुळे तिच्या पंखाला जखम झाली होती, त्यामुळे ती उडू शकत नव्हती.

ही बाब लक्षात येताच विशाल मोरे व श्री. शशिकांत नायकवडी यांनी तत्काळ संवेदनशीलता दाखवत घारीस पर्यावरण प्रेमी प्रशांत डोंगरे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. प्रशांत डोंगरे यांनी घारीवर योग्य वैद्यकीय उपचार व काळजी घेतली.काही दिवसांच्या उपचारानंतर घारीची प्रकृती सुधारली. पंखावरील जखम बरी झाल्यानंतर दि. ४ फेब्रुवारी रोजी सदर घारीस पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले.

Advertisement

या घटनेमुळे पतंगाच्या मांज्यामुळे पक्षी व वन्यजीवांना होणाऱ्या इजा पुन्हा एकदा समोर आल्या असून, नागरिकांनी नायलॉन व धारदार मांज्याचा वापर टाळावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. वेळेवर मदत आणि संवेदनशीलतेमुळे एका निरपराध जीवाला नवे आयुष्य मिळाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

नोव्हेंबर 2025 पासून 8 पक्षी जखमी मांजाने
पंतगाचा मांजा माणसाच्या जीवावर उठतो पक्षाचे जिवावर बेततो, याचाच प्रत्यय वाई मध्ये प्राणी प्रेमी प्रशांत डोंगरे यांना आला असून त्यांच्याकडे नोव्हेंबर 2025 ते आजपर्यंत आठ पक्षी मांजाने जखमी झाले म्हणून आले होते त्यांच्यावर त्यांनी उपचार करून अधिवासात सोडले.

Advertisement
Tags :

.