महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्कृष्ट पटकथेपासून नेहमीच चांगला चित्रपट बनतोच असे नाही

12:23 PM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रसिद्ध आयरिश सिमेमॅटोग्राफर ब्र्रेंडन गॅल्विन यांचे मत

Advertisement

पणजी : ख्यातनाम आयरिश सिनेमॅटोग्राफर ब्र्रेंडन गॅल्विन यांनी, आपल्या बिहाइंड एनीमी लाइन्स, वेरोनिका ग्वेरिन आणि फ्लाइट ऑफ द फिनिक्स यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांच्या दृश्यात्मक कथाकथनाचा पट उलगडला.  ते म्हणाले, “एक उत्तम पटकथा नेहमीच उत्तम चित्रपटाची हमी देत नाही.” ब्र्रेंडन म्हणाले की, विश्वासार्हता जपण्यासाठी स्वत:चे काही नियम असायला हवेत. चित्रपट बनवताना अनुकरण टाळून नाविन्यतेचा ध्यास घेणे महत्वाचे असून, चित्रीकरण करताना प्रेक्षकांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन, पारंपरिक संकल्पनांना आव्हान द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल बोलताना ते म्हणाले, “कलात्मक प्रतिभा सिद्ध करण्यासाठी नियम विसरून जाण्यासाठी शिकावेत. कलात्मक अभिव्यक्तीसाठी, अहंकार आणि वैयक्तिक उद्दिष्ट बाजूला ठेवणे खूप महत्वाचे आहे.

Advertisement

आपल्या दिमाखदार कारकिर्दीवर विचार मांडताना तरसेम सिंग यांनी चित्रपट निर्मात्यांकडे एक वेगळा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, यावर भर दिला. “उत्कृष्ट पटकथेवरून नेहमीच उत्कृष्ट  चित्रपट बनतो, असे नाही. प्रत्येक चित्रपटाची भाषा वेगळी असते, असे त्यांनी स्पष्ट केले. व्यावसायिक सिनेमाबाबत विचारलेल्या प्रŽाला उत्तर देताना, तरसेम सिंग यांनी, कथनाची खोलवर जाणीव असणे, ही चित्रपट बनवणाऱ्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. “चित्रपट बनवत आहोत, असा भ्रम उपयोगाचा नाही. हा केवळ शो बिझनेस नसून, बिझनेस शो आहे. बनावट क्षमतेपेक्षा जाणीवपूर्वक निवड महत्वाची आहे. नवीन गोष्ट सांगण्यासाठी दर वेळी नव्या आशयाचा शोध घ्या, असे सांगून तरसेम यांनी जाणीवपूर्वक निवड आणि निर्णय, भाषेची तरलता आणि प्रत्येक चित्रपटात नवा शोध घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article