For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

​सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर हनुमंताची भव्य मूर्ती उभारा

03:32 PM Feb 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
​सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर हनुमंताची भव्य मूर्ती उभारा
Advertisement

मालवणी करंडक महोत्सव समितीचे पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

​ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी येथील निसर्गरम्य नरेंद्र डोंगरावर प्रभू हनुमानाचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी मालवणी करंडक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संकल्पनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले असून, पर्यटनाच्या दृष्टीने ही एक उत्तम संकल्पना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.सावंतवाडी शहर हे संस्थानकालीन इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना या शहरात आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मालवणी करंडक महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या वतीने त्यांना २७ तारखेला होणाऱ्या भव्य एकांकिका महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.या भेटीदरम्यान समितीने नरेंद्र डोंगराच्या विकासाबाबत विशेष चर्चा केली. नरेंद्र डोंगरावर हनुमंताची भव्य मूर्ती उभारल्यास हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल आणि शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे निवेदन यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आले. श्री. राणे यांनी या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत ही संकल्पना शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरेल, असे सांगत कौतुक केले. यावेळी मालवणी करंडक समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर ,उपाध्यक्ष रुजूल पाटणकर, सचिव भुवन नाईक, सदस्य सौ. सावली पाटकर, मृणाल पावसकर, प्रशांत सावंत, मृणाल चेंडके,भालचंद्र लांबर,साहील सावंत आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.