महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांचे भव्य शक्तिप्रदर्शन

11:14 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मतदारसंघातील-राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची उपस्थिती

Advertisement

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार व खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने कारवार शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसने यावेळी नवी चाल करत खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना कारवार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. दरवेळी काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण दिसून येत होते. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली यावेळी अंजली निंबाळकर या महिला तसेच मराठा उमेदवाराला प्राधान्य देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसने चंग बांधला आहे. हे आजच्या शक्तिप्रदर्शनावरून दिसून येत आहे.

Advertisement

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची उपस्थिती 

यावेळी कारवार मतदारसंघासह आसपासच्या मतदारसंघातील काँग्रेसचे बडे नेते या शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते. यात हल्ल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे, कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार सतीश सैल, शिरशीचे आमदार भीमाण्णा नाईक, यल्लापूरचे माजी आमदार व्ही. एस. पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साई गावकर, कित्तूरचे आमदार बसनगौडा पाटील, काँग्रेसचे नेते निवेदित अल्वा यांसह कारवार लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय नेते उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सकाळी नऊ वाजता अंजली निंबाळकर यांनी शहरातील देवस्थानांना भेटी देऊन देवदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

 भव्य रोड शो

त्यानंतर अकरा वाजता कमलादेवी मैदानावरून भव्य रोड शोला सुरुवात झाली. यावेळी झांजपथक, तसेच डीजेच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. यावेळी वाहनावर स्वत: अंजली निंबाळकर, आर. व्ही. देशपांडे, कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीवेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्dयांना अभिवादन करण्यात आले. यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्dयांना मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कारवार शहर काँग्रेसमय झाले होते. सहभागी महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या डोक्यावर काँग्रेसची टोपी, गळ्dयात पट्टा, तसेच हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन कार्यकर्ते  रॅलीत सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेली मिरवणूक दुपारी 2 वाजता संपली. भर रखरखत्या उन्हातही कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात आल्यानंतर शिवाजी चौकात रॅलीचे भव्य सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनी अंजली निंबाळकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी भगवी साडी व भगवा फेटा बांधला होता. तर काँग्रेसच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते. त्यामुळे चर्चेचा विषय बनला होता. पत्रकारांनीही याबाबत अंजली निंबाळकर यांना छेडले. त्यावेळी भगवा हा सर्व हिंदूंचा रंग असून त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे. म्हणूनच देशाच्या तिरंग्यातही भगव्याला वरचे स्थान आहे. म्हणूनच आपण भगवा वेश आणि आणि भगवा फेटा परिधान केला आहे. भगवा रंग हा कुणाची मक्तेदारी नसून प्रत्येक हिंदूंचे प्रतीक आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते कारवार येथील कमलादेवी मैदानावर व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमण्यास सुरुवात झाली होती. सकाळी 11 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रचंड उष्ण हवामान असूनदेखील कार्यकर्ते शेवटपर्यंत या शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते.

उमेदवारी अर्ज दाखल

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. निंबाळकर यांनी एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. पहिला अर्ज शक्तिप्रदर्शन मिरवणुकीपूर्वी दाखल करण्यात आला. तर दुसरा अर्ज शक्तिप्रदर्शन मिरवणुकीनंतर दाखल करण्यात आला. निंबाळकर यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मंत्री पी. जी. आर. सिंदीया, कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. तर निंबाळकर यांनी दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करताना कारवारचे आमदार सतीश सैल, शिरसीचे आमदार भीमण्णा नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर उपस्थित होते. निंबाळकर यांच्या व्यतिरिक्त उत्तम राजकीय पक्षाचे उमेदवार सुनील देवेंद्र पवार आणि अपक्ष उमेदवार नागराज शिराली यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. कारवार लोकसभा मतदारसंघातून दहा उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article