महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रामतीर्थनगर येथे उभारणार भव्य क्रीडांगण

12:10 PM Sep 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमीपूजन : 50 कोटीचा खर्च अपेक्षीत

Advertisement

बेळगाव : रामतीर्थनगर येथे 50 कोटी रुपये खर्चून जिल्हा क्रीडांगण उभारण्याच्या कामाला सोमवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते चालना देण्यात आली. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने क्रीडांगण उभारण्यात येत आहे. भूमीपूजनानंतर सतीश जारकीहोळी म्हणाले, थोडासा उशीर झाला तरी उत्तम दर्जाचे क्रीडांगण उभारणार आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण उभारण्याचा योग आता आला आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्रीडापटूंना उत्तम दर्जाचे क्रीडांगण असणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा क्रीडांगणाच्या कामाला चालना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार येताच यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून स्थानिक आमदारांशी चर्चा करून क्रीडापटूंसाठी समुदाय भवन उभारण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

Advertisement

क्रीडांगणासाठी बुडाने 9 एकर 26 गुंठे जमीन मंजूर केली आहे. आणखी 6 एकर जमीन देण्यासाठी स्थानिक नागरिकांचाही होकार आहे. टप्प्याटप्प्याने ही कामे सुरू होणार आहेत. या क्रीडांगणामुळे राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत बेळगावचे क्रीडापटू उत्तम कामगिरी बजावणार आहेत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ म्हणाले, 15 एकर जमिनीत उत्तम दर्जाचे क्रीडांगण उभारले जात आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकारामुळे 50 कोटी रुपये निधी उपलब्ध आहे. यासाठी आणखी 150 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. तीन वर्षांत क्रीडांगण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या क्रीडांगणामुळे रामतीर्थनगरचाही विकास होणार आहे. या परिसरात देवस्थानही उभारण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, युवा सबलीकरण व क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास, विनय नावलगट्टी, मलगौडा पाटील, नगरसेवक हणमंत कोंगाली, सी. के. जोरापूर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article