कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

6 जानेवारी रोजी युवा समितीतर्फे भव्य सामान्यज्ञान स्पर्धा

11:21 AM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्पर्धा सीमाभागासाठी मर्यादित

Advertisement

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन, तसेच शिवकालीन इतिहास आत्मसात करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले आहे. 6 जानेवारी 2026 रोजी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून बेळगाव शहर, ग्रामीण, खानापूर तालुका व निपाणी भागातून विद्यार्थ्यांना सहभाग दिला जाणार आहे. मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन अशा दोन ठिकाणी दोन सत्रात स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

Advertisement

स्पर्धा सीमाभागासाठी मर्यादित असून चार गटांमध्ये घेतल्या जाणार आहेत. 1) प्राथमिक विभाग-लहान गट-इयत्ता चौथीपर्यंत, 2) प्राथमिक गट-मोठा गट-इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत, 3) माध्यमिक गट-आठवी ते दहावी, 4) महाविद्यालयीन विभाग-अकरावी ते पदव्युत्तर विभागांमध्ये स्पर्धा होणार आहे. सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, शिवकालीन इतिहास, शालेय अभ्यासक्रम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ व सीमाप्रश्न या संदर्भ पुस्तिकेवर आधारित स्पर्धा घेतली जाणार आहे.

विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पदक, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांनाही प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी 4 जानेवारी 2026 पर्यंत युवा समितीकडे नावे नोंदवायची आहेत. प्रतीक पाटील (7338145673) यासह अधिक माहितीसाठी अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांच्याशी कावळे संकुल, टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article