महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी वैभव नाईक सज्ज

03:34 PM Oct 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कुडाळात भव्य शक्तिप्रदर्शन ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज केला दाखल

Advertisement

कुडाळ । प्रतिनिधी

Advertisement

कुडाळ-मालवणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांनी गुरुवारी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी वैभव नाईक सज्ज झालेत . यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदार वैभव नाईक यांना स्थान मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले. कुडाळ येथील अनंत मुक्ताई समोरील पटांगणात महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, स्नेहा नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, रेवती राणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा) चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, भाई गोवेकर, प्रकाश जैतापकर, अक्षता खटावकर, किरण शिंदे, श्रेया गवंडे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.सभास्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील बस्थानकाकडून पोलीस ठाणे मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयाकडे ढोल ताशाच्या गजरात रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत निवडणूक निर्णय तथा प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे वैभव नाईक यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी वीरसिंग वसावे व वर्षा झालटे उपस्थित होत्या. रॅलीत शिवसैनिकांनी अलोट गर्दी केली होती. ढोल - ताशाच्या गजरात चालल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यामध्ये शिवसैनिकांमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता.शिवसैनिक-कार्यकर्त्यानी डीजे व ढोलताशाच्या गाण्यावर नाचून सारा परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे शहर परिसर भगवामय झाला होता.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # konkan update # marathi news # breaking news
Next Article