For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इजिप्तच्या वाळवंटात मिळाले सोन्याचे शहर

06:01 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
इजिप्तच्या वाळवंटात मिळाले सोन्याचे शहर
Advertisement

इतिहासातील सर्वात मोठा शोध

Advertisement

पुरातत्वतज्ञांनी इजिप्तच्या पूर्व वाळवंटात तूतनखामेनच्या मकबऱ्याशी तुलना होणाऱ्या गोष्टीचा शोध लावला आहे. या भागातील ओबडधोबड सुकारी पर्वतांमध्ये पुरातत्वतज्ञांना इजिप्तचे 3 हजार वर्षे जुने सोन्याचे शहर मिळाले आहे. हे एक जुने अॅडव्हान्स्ड गोल्ड प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स होते. वाळूत गडप झालेल्या या शहरात मानवाच्या दैनंदिन जीवनाच्या खुणाही मिळाल्या आहेत. या खुणा इतक्या स्पष्ट आहेत की हे पूर्ण शहर 3000 वर्षांपासून वाळूत दाबले गेले होते यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. हे केवळ खडकात खोदलेले  ठिकाण नव्हे तर येथे लोक काम करत होते, पूजा करायचे आणि व्यापार करायचे.

हा शोध इजिप्तच्या पर्यटन आणि अँटीक्विटीज मंत्रालयाच्या नेतृत्वात ‘जुन्या सोन्याच्या शहराला पुन्हा जिवंत करणे’ नावाने दीर्घकाळापासून चालेल्या प्रोजेक्टचा हिस्सा आहे. येथे सोन्याच्या खाणीसारखे ठिकाण मिळाले आहे. हा शोध इजिप्तच्या सुकारी पर्वतरांगेत लागला असून हा पर्वत आजही सोन्यासाठी ओळखला जातो. सुकारी पर्वतरांगेत आजही सोन्यासाठी खनन केले जाते.

Advertisement

हे ठिकाण एक प्रगत सोने प्रक्रिया केंद्र होते. या ठिकाणी दगडांना फोडणे आणि त्यातून सोने मिळविण्याचे केंद्र होते. येथे फिल्ट्रेशन बेसिन, सेडीमेंट टँक आणि मातीच्या भट्ट्या होत्या, ज्या सोन्याला वितळविणे आणि शुद्ध करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या होत्या. यातून हे काही अस्थायी कॅम्प नव्हते, तर एक व्यवस्थित सोन्याची खाण होती हे कळते. येथून केवळ फॅरोनिक युग नव्हे तर रोमान आणि इस्लामिक काळातील आर्किटेक्चरल अवशेषही मिळाले आहेत.

हे अवशेष अत्यंत विचारपूर्वक करण्यात आलेले कार्य दर्शवितात. सोने केवळ एकत्र करण्यात आले नव्हते, तर ते मिळवत, त्यावर प्रक्रिया करण्यासह कुशलपणे ते शुद्ध करण्यात आले होते असा दावा इजिप्तच्या सुप्रीम कौन्सिल ऑफ अँटीक्विटीजचे मोहम्मद इस्माइल खालिद यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.