For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्खननात मिळाला चमकणारा जांभळ्या रंगाचा दगड

06:26 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्खननात मिळाला चमकणारा जांभळ्या रंगाचा दगड
Advertisement

श्रीलंकेच्या भूमीवर एक असा खजिना मिळाला आहे, जे पाहून लोकांचे डोळे विस्फारत आहेत. कोलंबोत ‘स्टार ऑफ प्योर लँड’ नावाचा पर्पल स्टार सफायर करण्यात आला असून तो 3563 कॅरेट वजनी आहे. जेमोलॉजिस्ट अशन अमरसिंघे यांनी याला जगातील सर्वात मोठा डॉक्यूमेंटेड नॅचरल पर्पल स्टार सफायर घोषित केले आहे. हे रत्न श्रीलंकेची जेम सिटी रत्नपुरानजीक एका जेम पिटमध्ये मिळाले आहे. याचे मालक आता याची विक्री करण्यासाठी तयार आहेत.

Advertisement

अत्यंत खास दगड

स्टार सफायरचे वैशिष्ट्या त्याचा एस्टेरिजम आहे. म्हणजेच प्रकाश पडल्यावर यात 6- रेचा प्रभाव दिसतो. म्हणजेच एखाद्या चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे तो दिसतो. हा जांभळ्या रंगात असून श्रीलंकेचे सफायर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांची क्लॅरिटी, रंग आणि नॅचरल शिमरसाठी ते ओळखले जातात. या रत्नाला दोन लॅब्स जेमोलॉजिकल इन्स्टीट्यूट ऑफ अमेरिका (जीआयए) आणि लंका जेमोलॉजिकल लॅबोरेट्रीने सर्टिफाय केले आहे. हा राउंड कॅबोचॉन कटमध्ये असून तो एस्टेरिज्मला प्रभावीपणे दाखवतो. सर्वाधिक चर्चा याच्या किमतीची आहे. आंतरराष्ट्रीय मूल्यकारांनी याची किंमत जवळपास 2500 कोटी ते 3500 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. ही किंमत मिळाल्यास हे जगातील सर्वात महाग जेम्सपैकी एक ठरणार आहे.

Advertisement

यापूर्वीही मिळाले अमूल्य सफायर

2025 मध्ये ‘द रीजेंट काश्मीर’ ब्ल्यू सफायर 9.5 दशलक्ष डॉलर्समध्ये विकला गेला होता. हा केवळ काही कॅरेटचा होता. यावेळी जो दगड मिळाला आहे, तो 3563 कॅरेटचा आहे. स्टार इफेक्ट याला आणखी खास ठरवतो. पूर्वीचा प्रसिद्ध ‘स्टार ऑफ इंडिया’ (563 कॅरेट) अमेरिकेच्या संग्रहालयात आहे, तर स्टार ऑफ लंका (393 कॅरेट) हा श्रीलंकेकडे आहे. हा नवा रत्न  त्याहून 6-9 पट मोठा आहे. रत्नपुरा येथून यापूर्वी ब्लू जायंट ऑफ ओरिएंट (466 कॅरेट), लोगन ब्ल्यू (423 कॅरेट), ब्ल्यू बेल ऑफ एशिया (400 कॅरेट) मिळाले आहेत. हा नवा खजिना श्रीलंकेच्या जेम इंडस्ट्रीला प्रोत्साहन देणार आहे. तेथे मायनिंग पारंपरिक पद्धतीने होते आणि हे दशलक्ष वर्षे जुन्या जियोलॉजिकल प्रक्रियेचा परिणाम आहे.

Advertisement
Tags :

.