For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दर्शन 2118 सालाचे

06:22 AM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
दर्शन 2118 सालाचे
Advertisement

माणूस वर्तमान काळात जगतो, भूतकाळाची माहिती ग्रंथांमधून किंवा त्यावेळच्या, आज उपलब्ध असणाऱ्या इतर साधनांमधून घेतो, तर भविष्यकाळाची केवळ कल्पना करु शकतो, असे मानण्याचा प्रघात आहे. तथापि, अमेरिकेतील एका वयस्क व्यक्तीने असे प्रतिपादन केले आहे, की त्याने आजपासून 100 वर्षांनी येणाऱ्या काळाचे दर्शन घेतले आहे. 2118 मध्ये शहरे, मानवी जीवन आणि पर्यावरण यांची स्थिती कशी असेल, याचे प्रत्यक्ष दर्शन आपण घेतले आहे, असे त्याचे म्हणणे आहे. त्याने 2118 या वर्षातील काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. हा व्यक्ती  ‘समय यात्री“ म्हणून ओळखला जात आहे. सध्या त्याचे हे प्रतिपादन अनेकांच्या कुतुहलाचा विषय बनले असून इंटरनेटवर तो चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येते.

Advertisement

या व्यक्तीचे नाव अलेक्झांडर स्मिथ असे असून त्याच्या प्रतिपादनानुसार त्याने ही भविष्यकाळाची प्रयक्ष यात्रा ‘सीआयए“ संस्थेच्या एका गुप्त उपक्रमाच्या माध्यमातून केली आहे. 1981 मध्ये अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने हे अभियान हाती घेतले होते आणी आपण या अभियानाचा एक भाग होतो. या अभियानाच्या अंतर्गत मी भविष्यकालीन जगाचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे, असे स्मिथ यांचे म्हणणे आहे. आपल्यसमवेत अत्यंत निवडक अशा काही लोकांना यशस्वीपणे भविष्ययात्रेसाठी पाठविण्यात आले होते आणि तेथे आम्ही जे पाहिले आणि अनुभवले, त्याची वाच्यता न करण्याची अट आमच्यावर घालण्यात आली आहे. मात्र, आता त्यांनी या गुप्ततेचा भंग केल्याने त्यांच्या मागे सीआयएचा ससेमिरा लागला आहे, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. आता सीआयएच्या वतीने त्याच्या प्रतिपादनाची पडताळणी केली जात आहे. त्याच्या कथनावर अनेक लोकांचा विश्वास बसल्याचे दिसत आहे. तर इतर अनेकजण हा प्रसिद्धीसाठी केलेला उपद्व्याप आहे, असा आरोप करतात. कारण भविष्यकाळाची प्रत्यक्ष यात्रा घडविणारे कोणतेही साधन आज उपलब्ध नाही. ‘टाईम मशिन“ किंवा ‘कालदर्शक यंत्र“ हा प्रकार केवळ कल्पनेतच अस्तित्वात आहे. तथापि, भविष्यकाळासंबंधीची तीव्र उत्सुकता आपल्यामध्ये असतेच. त्यामुळे अशा प्रतिपादनांवर विश्वास ठेवला जातो, असे अनेकांचे म्हणणे आहे. शेवटी या बाबी विश्वासावरच अवलंबून आहेत. पण अशी प्रतिपादने करणाऱ्यांना प्रसिद्धी खूप मिळते, ही बाबही स्पष्ट होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.