For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाण्याचीच अॅलर्जी असणारी युवती

06:15 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
खाण्याचीच अॅलर्जी असणारी युवती
Advertisement

दोनवेळा मरता-मरता वाचली

Advertisement

जगात अनेक लोकांना विचित्र गोष्टींपासून अॅलर्जी असते. काही जण उन्हात गेल्यास अॅलर्जीचे शिकार होतात. तर काही जणांना थंडीची भयानक अॅलर्जी असते. परंतु एखाद्याला खाण्याचीच अॅलर्जी असेल तर तो कसा जगेल याचा विचार करून पहा.

आमच्या जीवनात खाणे-पिणे अत्यंत आवश्यक आहे. खाल्ल्यानंतरच्या स्थितीत अॅलर्जी किंवा वेदना होऊ लागल्यास संबंधिताची स्थिती काय असेल? परंतु एका युवतीला कुठलाही खाद्यपदार्थ सर्वसामान्यांप्रमाणे फस्त करता येत नाही.

Advertisement

अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या युवतीला अजबच अॅलर्जी आहे. सर्वसामान्यांच्या आहारात सामील कुठलीही गोष्ट ती खाऊ शकत नाही. 24 वर्षीय कॅरोलिन क्रेची समस्या कळल्यावरच अजब वाटू लागते. परंतु एका अशा डिसऑर्डरची शिकार आहे, ज्यामुळे ती मासे, शेंगदाणे, तिळ, भात, किवी देखील खाऊ शकत नाही. जर यातील तिने काहीही खाल्ले तर तिला एनाफिलॅटिक शॉक बसू शकतो, तसेच ती मृत्यूच्या दारात पोहोचू शकते.

सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा तिला अॅलर्जी झाली होती. तेव्हा तिने आईस्क्रीम खाल्ले होते आणि तिला 12 तास रुग्णालयात रहावे लागले होते. याचबरोबर तिला पिझ्झा, ब्रेड, भात आणि बीन्स खाऊनही आयसीयूत दाखल व्हावे लागले होते. अॅलर्जीदरम्यान तिच्या गळ्यात सूज, खाज आणि हाइव्ज होतात. अशा स्थितीपासून वाचण्यासाठी ही युवती आता केवळ दोन गोष्टींवर जिवंत आहे, ओटमील आणि मुलांना देण्यात येणारे फॉर्म्युला मिल्क ती आहारात घेते. दिवसातून तीनवेळा हेच खाऊन ती जगत आहे.

Advertisement
Tags :

.