For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काही न खाऊ शकणारी युवती

06:35 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
काही न खाऊ शकणारी युवती
Advertisement

कुठेही जाता येत नाही, अजब आजार

Advertisement

मानवी शरीराहून अधिक गुंतागुंत कुठल्याच गोष्टीत नसते. याचे कारण शरीराच्या आतील रचना आहे. अनेकदा शरीरात नेमकं काय घडतेय हेच आपल्याला समजत नाही. काहीसे असेच एका युवतीसोबत घडले आहे, तिनेही काहीही खाल्ले किंवा बाहेर गेली तर ती भयानक अॅलर्जीची शिकार होते. कधीकाही सामान्य जीवन जगणारी युवती आता घरातच कैद झाली आहे.

एमी फ्रँसिस स्मिथ नावाच्या मुलीला सर्वसामान्य लोक ज्या गोष्टीचा आनंद घेता अशा सर्व गोष्टींची अॅलर्जी आहे. मला इतक्या गोष्टींपासून अॅलर्जी आहे की मी त्याविषयी विचार करूनच मानसिक स्वरुपात आजारी होऊ लागते असे एमीने सांगितले आहे.

Advertisement

एमी फ्रान्सिलला 2015 पासून अनेक गोष्टींपासू अॅलर्जी झाल्याने तिचे जीवन अत्यंत अवघड ठरले आहे. ती इतरांप्रमाणे खाऊ शकत नाही तसेच तिला गंधाचीही अॅलर्जी आहे, इंग्लंडची नागरिक असलेल्या एमीला सर्वप्रथम टोमॅटो आणि शेंगदाण्याच्या अॅलर्जीबद्दल कळले होते. हळूहळू फळे आणि धान्याचीही अॅलर्जी होऊ लागली. आता तिला कार्बोनेटेड वॉटर, पब्लिक ट्रान्सपोर्ट, एअर फ्रेशनर, उष्णता आणि थंडीचीही अॅलर्जी आहे. अनेकदा डॉक्टरांनाही या अॅलर्जीचा उलगडा झाला नव्हता, त्यांनी एमी केवळ निमित्त देत असल्याचे त्यांना वाटायचे.

केवळ 4 गोष्टींवर जिवंत

अॅलर्जिक गोष्टींच्या संपर्कात आल्यावर तिला अजब शॉक बसतो. शरीरावर हाइव्स आणि श्वसनावेळी त्रास होऊ लागतो. अनेकदा तिला कित्येक आठवड्यांपर्यंत रुग्णालयात रहावे लागते. आता ती केवळ 4 गोष्टीच खाऊ शकते. यात एक विशेषप्रकारचे मांस, जुकीनी, वांगी आणि भाताचा समावेश आहे.  या 4 गोष्टींवरच जगावे लागत असल्याने ती कुपोषणाची शिकार ठरली आहे.

Advertisement
Tags :

.