For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘फेथ’ नावाची युवती निघाली ‘अनफेथफूल’

12:08 PM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘फेथ’ नावाची युवती निघाली ‘अनफेथफूल’
Advertisement

विद्यार्थीदशेतच गुरफटली अमलीपदार्थ व्यवहारात : नायजेरियन युवतीला गिरी म्हापसा येथे अटक

Advertisement

पणजी : एखाद्याचे नाव ‘विश्वास’ असले तरी काही लोक त्या नावास असा काही बट्टा लावतात की भविष्यात मग लोक सदैव त्यांना अविश्वासू म्हणूनच पाहतात. असाच काहीसा प्रकार फेथ (विश्वास) चिमेरी (24) या नायजेरियन युवतीच्या बाबतीत घडला. पोलिसांनी तिच्यावर अविश्वास दाखवत झडती घेतली असता लाखो ऊपयांचे अमलीपदार्थांचे घबाडच सापडले. त्यावरून पोलिसांचा संशय सार्थ ठरला व ती युवती खरोखरच ‘विश्वास’ ठेवण्याच्या लायकीची नसल्याचे सिद्ध झाले. गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी ही कारवाई केली. फेथ नामक सदर नायजेरियन युवतीकडून 150 ग्रॅम एम्फेटामाइन आणि 100 ग्रॅम गांजा, तसेच मद्याच्या काही बाटल्या असा मुद्देमालही जप्त केला. त्यांची किंमत सुमारे 15 लाख ऊपये आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी नंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या नायजेरियन युवतीचा गोव्यातील अमलीपदार्थ पुरवठा साखळीत सहभाग असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. सदर युवती बंगळुरूला जाणाऱ्या आंतरराज्य बसमधून गोव्यात आली होती व गिरी म्हापसा येथे ग्रीन पार्क हॉटेलजवळील बस स्टॉपवर उतरली होती.

मात्र ही बातमी तिच्यापूर्वीच पोलिसांपर्यंत पोहोचली होती व तिला जाळ्यात अडकविण्यासाठी उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखालील अमलीपदार्थ विरोधी पथकाने आधीच तेथे सापळा लावला होता. त्यांनी लगेच तिला पकडले आणि झडती घेतली असता वरीलप्रमाणे अमलीपदार्थांचे घबाड हाती लागले. प्राथमिक चौकशीत सदर युवती दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी व्हिसावर भारतात आल्याचे समोर आले आहे. त्यानुसार तिने लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. परंतु तेथून ती बंगळुऊला आली व भलतेच उद्योग करू लागली. त्यातूनच पुढे ती अमलीपदार्थ व्यवहारात सक्रिय झाली. त्याच व्यवहारातून अमलीपदार्थांची विक्री आणि वितरणासाठी ती बंगळुरूहून गोव्यात आल्याचा कयास आहे. गोवा पोलीस तिच्याबाबत कर्नाटक पोलिसांकडूनही अधिक माहिती मिळविणार आहे, असे कौशल यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमलीपदार्थ विरोधी पथकाने अशाच प्रकारे बोरी फोंडा येथे एका स्थानिक तऊणाला अटक करून, ‘हायड्रोपोनिक गांजा’ प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला होता. आपल्या घराच्या परसबागेत त्याने चक्क गांजाची लागवड केली होती. गोव्यातील अमलीपदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी चालू वर्षात आतापर्यंत 3.77 कोटी ऊपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यात स्थानिकांसह देशी आणि विदेशी अशा 9 जणांना अटक केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.