For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तमिळ परिवारांसाठी 50 हजार घरांची भेट

06:29 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
तमिळ परिवारांसाठी 50 हजार घरांची भेट
Advertisement

उपराष्ट्रपतींचा श्रीलंका दौरा : तमिळ समुदायाशी साधला संवाद

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी स्वत:च्या दोन दिवसीय श्रीलंका दौऱ्यादरम्यान सोमवारी नुवारा एलियाच्या केंद्रीय टी गार्डन जिल्ह्यात भारताच्या सहाय्याने निर्मित घरांच्या भारतीय वंशाच्या तमिळ लाभार्थींशी संवाद साधला. कुठल्याही भारतीय उपराष्ट्रपतींचा हा पहिला श्रीलंका दौरा आहे. यादरम्यान त्यांनी भारत सरकार आणि भारतीयांची श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या कल्याणाबद्दलच्या दृढ प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

Advertisement

भारत सरकारने आतार्यंत श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व प्रांतांसोबत चहामळा क्षेत्रांमध्ये भारतीय वंशाच्या तमिळ परिवारांसाठी 50 हजार घरं उपलब्ध करविली आहेत. भारतीय आवास प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याच्या अंतर्गत आणखी 10 हजार घरं बांधून दिली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 1835 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच हा श्रीलंकेतील सर्वात मोठा अनुदान सहाय्य प्रकल्प आहे.

ओसीसी कार्डची कक्षा वाढविणार

भारतीय वंशाच्या तमिळांसोबत संवादादरम्यान उपराष्ट्रपतींनी प्रवासी नागरिक कार्डला (ओसीसी) पाचव्या आणि सहाव्या पिढीच्या स्थलांतरितांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. हे कार्ड यापूर्वी केवळ चौथ्या पिढीपर्यंतच मर्यादित होते. याचबरोबर सीलोन इस्टेट वर्कर्स एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती योजनेतही वृद्धी करण्यात आली आहे, याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभार्थींची संख्या 350 वरून वाढवत 700 करण्यात येणार आहे. तसेच मासिक विद्यावेतनही ए-लेव्हलच्या विद्यार्थ्यांसाठी 2500 एलकेआर आणि उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्यांसाठी 7500 एलकेआरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

गृह प्रकल्पाचा तिसरा टप्पा

भारतीय गृह प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत 4000 घरांपैकी 3855 घरांना यापूर्वीच सोपविण्यात आले होते. तर उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान उर्वरित 145 घरांचा ताबा लाभार्थींना देण्यात आला आहे. हा टप्पा श्रीलंकेच्या मध्य अन् दक्षिण प्रांतांच्या चहामळ्यांच्या क्षेत्रातील कामगारांसाठी घरं निर्माण करतो. हा प्रकल्प भारत आणि श्रीलंकेदरम्यान मजबूत संबंधांचा प्रतीक आहे. चौथ्या टप्प्यात 10 हजार घरांसाठी काम सुरू आहे.

द्विपक्षीय सहकार्य

-उपराष्ट्रपती राधाकृष्ण यांनी रविवारी श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमारासुरिया यांची भेट घेत शिक्षणाच्या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली.

-या भेटीदरम्यान सीलोन इस्टेट वर्कर्स एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

-उपराष्ट्रपतींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासोबत प्रस्तावित तेल पाइपलाइनविषयी चर्चा केली आहे.

-दोन्ही देशांच्या नेत्यांनी बहुआयामी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यावर चर्चेदरम्यान सहमती व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.