महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एटीएम कार्ड बदलून लुटणारी टोळी गजाआड

12:12 PM Sep 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तरप्रदेशमधून बेळगावात : जागरुक बँक ग्राहकामुळे जाळ्यात : जमावाच्या मारहाणीत आरोपी जखमी

Advertisement

बेळगाव : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या बँक ग्राहकांची एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातील रक्कम लुटणारी उत्तर प्रदेशमधील एक टोळी बेळगाव पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. फसवणूक करून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाचा पाठलाग करून संतप्त जमावाने त्याला चोप दिला आहे. रविवारी काकती येथे ही घटना घडली आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा गणेशोत्सव बंदोबस्तात गुंतलेली असतानाच घडलेल्या या घटनेनंतर पोलीस यंत्रणेला खडबडून जाग आली असून उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारांच्या टोळीचा माग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या टोळीतील एकाला पकडण्यात आले असून आणखी एक जण जखमी आहे. तर त्यांचा एक सहकारी फरारी आहे. बंबरगा, ता. बेळगाव येथील संजय सातबा दावतार (वय 41) हे रविवारी 15 सप्टेंबर रोजीदुपारी काकती येथील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममधून पैसे येत नव्हते. त्यावेळी जवळच उभारलेल्या दोघा जणांनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने संजय यांचे एटीएम कार्ड आपल्याकडे घेऊन भलत्यांचेच कार्ड त्यांना दिले होते.

Advertisement

एटीएममधून पैसे येत नाहीत म्हणून संजय तेथून बाहेर पडले. केवळ दहा मिनिटात त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. 26 हजार रुपये त्यांच्या खात्यातून गायब झाले होते. आपण तर पैसे काढले नाहीत, 26 हजार रुपये कोणी काढले? असा प्रश्न त्यांना पडला. लगेच मदत करण्याच्या बहाण्याने एटीएममध्ये भटलेल्या दोघा जणांचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आले. संशयाने ते मोटरसायकलवरून होनग्याच्या दिशेने गेले. तेथील एका एटीएमसमोर काकतीमध्ये भेटलेले दोघे जण उभे होते. यापैकी संजय यांनी त्यांची भेट घेऊन तुम्ही एटीएम कार्ड बदललात? अशी विचारणा करताच त्या दोघांनी तेथून पळ काढला. यापैकी एकाला पाठलाग करून पकडण्यात आले. संजय यांनी स्थानिक नागरिकांना आपल्याला झालेल्या फसवणुकीविषयी माहिती देताच संतप्त जमावाने एकाला चोप दिला.

अनिलकुमार (वय 45) रा. परशुरामपूर, ता. राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जमावाच्या मारहाणीत त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी अनिलकुमारने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पासिंगच्या एका कारमधून तिघे जण बेळगावला आल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी टोलनाक्यावर त्यांच्यासाठी सापळा रचला. महामार्गावर कार अडवून महम्मद विक्रम (वय 35) रा. उत्तरप्रदेश याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय दावतार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे उत्तरप्रदेशमधील गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून चौकशीअंती या टोळीविषयी अधिक माहिती उजेडात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article