For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंधाऱ्याचे लोखंडी गेट चोरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक

11:20 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंधाऱ्याचे लोखंडी गेट चोरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक
Advertisement

बदामी पोलिसांची कारवाई : 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Advertisement

बेळगाव : रखवालदाराचे हात बांधून मलप्रभा नदीवरील बंधाऱ्याचे लोखंडी गेट पळविणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील पाच जणांना बदामी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दि. 3 एप्रिल रोजी रात्री 11.55 वाजण्याच्या सुमारास चोळचगु•, जि. बागलकोट येथील मलप्रभा नदीवरील बंधाऱ्याचा रखवालदार गुरुराज हिरेमठ याचे हात बांधून दरोडेखोरांनी सुमारे 50,700 रुपये किमतीचे लोखंडी गेट व रखवालदाराच्या खिशातील 800 रुपये लांबवले होते. बदामी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती. बागलकोटचे जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रे•ाr, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महांतेश जिद्दी, हुनगुंदचे पोलीस उपअधीक्षक विश्वनाथराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बदामीचे मंडल पोलीस निरीक्षक करिअप्पा बन्ने व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच जणांना अटक केली आहे. बंधाऱ्याचे गेट पळविण्यासाठी वापरलेली केए 40, एबी 9684 क्रमांकाच्या गुड्स वाहनाची माहिती मिळविण्यात आली. त्याचा मालक चिक्कबळ्ळापूरमधील आहे. मात्र, सध्या हे वाहन गजेंद्रगड येथील मुत्ताप्पा गोंधळी यांना विकल्याचे समजताच गजेंद्रगडला जाऊन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून दोन गुड्स वाहने, दोन मोटारसायकली, बंधाऱ्याचे 13 गेट, 800 रुपये रोख रक्कम असा 7 लाख 91 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.