कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur : पुलाची शिरोलीत ऐडक्यांनी हल्ला करणाऱ्या चौघांची धिंड; पाच दिवसांची पोलीस कोठडी

12:29 PM Nov 21, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                        पुलाची शिरोलीत दुसऱ्यांदा आरोपींची धिंड

Advertisement

पुलाची शिरोली : पुलाची शिरोलीत ऐडक्यांनी हल्ला करत दहशत निर्माण केलेल्या चौघांची गुरुवारी सायंकाळी धिंड काढण्यात आली.या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. हि कारवाई सपोनी सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद चव्हाण व अमित पांडे यांनी केली.

Advertisement

पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथील कोरगावकर काॅलनीतील श्रीराम बेकरी समोर मंगळवारी रात्री पुर्व वैमनस्यातून दांपत्यासह मुलावरही ऐडक्याने हल्ला केला होता. बुधवारी रात्री उशिरा सर्व आरोपींना कागल येथे ताब्यात घेऊन अटक केली होती. हल्ला करणाऱ्या चौघांची गुरूवारी सायंकाळी कोरगावक कॅलनी, हौसिंग सोसायटी, सावंत कॅलनी, विलास नगर, माळवाडी भाग, गावभाग या परिसरात धिंड काढण्यात आली.यावेळी त्यांना बघण्यासाठी अबाल वृद्ध व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या चार आरोपींना वडगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्याना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वैभव राजू बेडेकर (वय. २५ रा लालबहादूर हौसिंग सोसायटी, माळवाडी पुलाची शिरोली ) आर्यन अनिल शिंदे ( वय १८ ) साहिल अरुण बनगे( वय २२) , साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक वय २१ सर्व रा. सावंत कॉलनी, माळवाडी,पुलाची. या चौघांनी ज्या परिसरात या दांपत्यावर हल्ला केला त्या घटनास्थळावरून व गावातून त्यांची धिंड काढण्यात आली .

शिरोली गावातून गुन्हेगारी प्रवृतीच्या आरोपींची दुसर्‍यांदा धिंड काढण्यात आली. पहिली धिंड स्मशानात आघोरी पुजा करणाऱ्या मांत्रिक व व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्याची तर गुरुवारी या चौघांची धिंड निघाल्याने पोलिसांनी अशाच प्रकारे गुन्हेगारी रोखण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी सपोनी सुनील गायकवाड यांनी फाॅरेन्सिक लॅब प्रतिनिधी व पोलीसांच्या सहाय्याने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAmbap Shiroli Police ActionAssault Accused ParadeForensic InvestigationMaharashtra crime newsPolice Custody ShiroliShiroli Crime IncidentShiroli Violence Case
Next Article