For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : उंब्रजजवळ पिकअप टेम्पोवरील हटके संदेश ठरला चर्चेचा विषय

05:24 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   उंब्रजजवळ पिकअप टेम्पोवरील हटके संदेश ठरला चर्चेचा विषय
Advertisement

                                  उंब्रज–कराड मार्गावर हटके विचारांची चर्चा

Advertisement

उंब्रज : वाहनांच्या मागील बाजूस विविध संदेश लिहिण्याची अनेकांना आवड असते. काही संदेश वाहतूक सुरक्षेचा इशारा देणारे असतात. तर काही हटके व विनोदी शैलीतून समाजाला संदेश देतात. गुरुवारी महामार्गावरून धावणाऱ्या एका पिकअप टेम्पोच्या पाठीमागे लिहिलेल्या एका वाक्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून ते चर्चेचा विषय ठरले आहे.

'व्यवसायात गुंतलेली व्यक्ती पोरीच्या माग कधी फिरत नाही मित्रा' असे हे वाक्य टेम्पोच्या मागील बाजूस ठळक अक्षरात लिहिलेले होते. या वाक्यातून बेधुंदपणे वाहन चालवणाऱ्या, विशेषतः दुचाकीवर वराडे टोल नाक्यावर पिकअप टेम्पोच्या मागे लिहिलेले वाक्य वाहनधारकांत चर्चेचा विषय ठरले.'धूम स्टाईल'ने फिरणाऱ्या तरुणांना रोखठोक संदेश दिला आहे.

Advertisement

कराड तालुक्यातील बराडे गावाजवळ नव्याने सुरू झालेल्या टोल नाक्यावर गुरुवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारासहा पिकअप टेम्पो टोल भरण्यासाठी थांबला होता. यावेळी कराडहून सातारा दिशेने प्रवास करणाऱ्या अनेक वाहनधारकांचे लक्ष या वाक्याकडे वेधले गेले. काहींनी हे वाचून आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी हा संदेश समाजप्रबोधन करणारा असल्याची प्रतिक्रिया दिली.

या पिकअप टेम्पोबरील संदेश अनेक दुचाकीस्वारांनी व वाहनचालकांनी वाचला असून महामार्गावर काही काळ तो चर्चेचा विषय ठरला. 'व्यवसायात गुंतलेली व्यक्ती पोरीच्या माग कधी फिरत नाही मित्रा' हे वाक्य केवळ विनोदापुरते न राहता, तरुणाईला जीवनात योग्य दिशा व प्राधान्ये ठरवण्याचा अप्रत्यक्ष संदेश देणारे ठरत आहे.

Advertisement
Tags :

.