पाण्याऐवजी झाडावर राहणे पसंत करणारा बेडुक
चमकणारी पारदर्शक त्वचा
बेडकाच्या अनेक प्रजाती अत्यंत अनोख्या असतात, याचपैकी एक मंकी फ्रॉग आहे. हा बेडुक दक्षिण अमेरिकेत आढळून येतो. हा बेडुक स्वत:च्या जीवनचक्रासाठी पाण्यावर मोठ्या प्रमाणावर निर्भर असतो परंतु तरीही यातील काही बेडुक हे कोरड्या वातावरणात जगत असतात. पराग्वेच्या शुष्क भागांमध्ये मंकी फ्रॉगची एक विशेष प्रजाती आढळून येते, ज्याला वॅक्सी मंकी ट्री फ्रॉग किंवा वॅक्स मंकी लीफ फ्रॉग म्हटले जाते.
रात्री संचार करणारा हा वॅक्सी मंकी ट्री बेडुक झाडांवर राहतो आणि किटकांना फस्त करतो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे स्वत:ला वातावरणानुसार बदलण्याची क्षमता आहे. याची दोन तृतीयांश त्वचा चमकणाऱ्या मेणाची असते, प्रत्यक्षात याच्या त्वचेवर एका खास ग्रंथीमुळे चमकणारे पारदर्शक आवरण निर्माण होते. मेणासारख्या त्वचेमुळे वॅक्सी मंकी ट्री फ्रॉग आर्द्रतेशिवाय दीर्घकाळापर्यंत पाण्यात स्वत:ला रोखून ठेवू शकतो. याचमुळे उन्हात हा बेडुक दीर्घकाळापर्यंत न सुकता राहू शकतो. ही किमया अन्य सरीसृप करू शकत नाहीत.
बेडकाच्या त्वचेवरील पदार्थ विषारी असू शकतात. परंतु या पदार्थांवर अद्याप विस्तृत संशोधन झाले नाही हे देखील सत्य आहे. वॅक्सी मंकी ट्री फ्रॉगच्या त्वचेचे पदार्थ विषारी असतात, ज्यामुळे हॅपिटायसिस होऊ शकतो. याचबरोबर ते अनेक अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात. तर अनेक ठिकाणी हर्बल औषध म्हणून त्यांचा वापर केला जातो.
हा बेडुक अशाप्रकारे बसतो की समोर एखादा माकडच बसला आहे असे वाटत असते. याचमुळे त्याला मंकी ट्री फ्रॉग हे नाव मिळाले आहे. या प्रकारामुळे या बेडकाचा जमीन किंवा बसलेल्या जागेशी कमीतकमी संपर्क होतो, यामुळे त्याच्या त्वचेवरील पदार्थ कायम राहतात असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
वॅक्सी मंकी ट्री फ्रॉग स्वत:च्या मेटाबॉलिज्मला इतके कमी करू शकतात की ते एकप्रकारे हायबेरनेशनच्या अवस्थेत पोहोचतात. हा प्रकार अस्वलासारखा प्राणी करत असतो, ज्यामुळे तो काहीही न खाता-पिता कित्ये आठवड्यांपर्यंत सुस्त पडून राहतो आणि त्याला काहीच होत नाही. हा बेडुक तीव्र उन्हाळ्यात छोट्या प्रमाणात अशाचप्रकारची अवस्था निर्माण करतो. परंतु त्यांचे हे मंद मेटाबॉलिज्म कमी कालावधीसाठी असते.
या वॅक्सी मंकी ट्री फ्रॉगचे प्रजनन देखील अत्यंत जटिल असते. यात मादी पानांच्या पृष्ठभागावर अंडी देतात, हे काम सर्वसाधारणपणे बेडुक पाण्यात करतो, ही पानं तलाव किंवा सरोवरावरील असतात, यामुळे लार्वा अंड्यातून थेट पाण्यात पडत असतात.