मित्रानेच लांबवले साडेसात लाख रुपये
रत्नागिरी :
शहरातील किर्तीनगर येथे भाड्याने वास्तव्य करत असलेल्या सहकारी मित्राने 7 लाख 50 हजार रुपये चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना 1 जून रोजी सकाळी 5 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान घडल़ी मोहम्मद आलम समसाद खान (27, ऱा किर्तीनगर रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी त्याच्या संशयित मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.
प्रदीपसिंह मलखासिंह यादव (ऱा किर्तीनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े मोहम्मद खान व प्रदीपसिंह यादव हे किर्तीनगर येथे भाड्याची खोली घेवून वास्तव्य करत होत़े 1 जून रोजी प्रदीपसिंह हा 7 लाख 50 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेवून निघून गेला, अशी तक्रार मोहम्मद खान याने शहर पोलिसात दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305(क) नुसार गुन्हा दाखल केल़ा