कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाने 5 लाख 33 हजाराचा गंडा

11:10 AM Jun 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघा तऊणांना 5 लाख 33 हजार ऊपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना 14 ते 17 जून 2025 दरम्यान घडल़ी याप्रकरणी माझ ऐजाज सुभेदार (28, ऱा धनजीनाका रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी ज़ी श्ऱी किशना नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा

Advertisement

तक्रारदार माझ सुभेदार यांची आरोपी ज़ी श्री किशना याच्याशी टेलिग्राम अॅपवर ओळख झाली होत़ी यावेळी किशना याने ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष तक्रारदार यांना दाखवल़े त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ सुभेदार याने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवल़ी 14 ते 17 जून 2025 या दरम्यान तक्रारदार यांनी स्वत:च्या खात्यामधून 1 लाख 75 हजार ऊपये तर मित्राच्या खात्यामधून 3 लाख 58 हजार ऊपये किशना याने सांगितलेल्या खात्यावर जमा केल़े पैसे जमा करूनही तक्रारदार यांना परतावा मिळत नसल्याने त्यांनी याबाबत आरोपी याच्याकडे विचारणा केल़ी यावेळी आरोपीने आणखी पैसे भरावे लागतील, असे तक्रारदारांना सांगितल़े वारंवार आरोपी हा पैशाची मागणी करत असल्याने तक्रारदार यांना झालेल्या व्यवहाराबाबत शंका निर्माण झाल़ी

तक्रारदार याने गुंतवणूक केलेल्या पैशाची मागणी केली असता आरोपी हा टाळाटाळ करू लागल़ा या सर्व प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केल़ी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायदा कलम 318(4), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केल़ा

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article