For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारतीय बाजारात जोरदार खरेदीमुळे तेजीचा ‘चौकार’

06:45 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय बाजारात जोरदार खरेदीमुळे तेजीचा ‘चौकार’
Advertisement

सेन्सेक्स 1225 अंकांनी तेजाळला : एफएमसीजी, रिअल्टी आणि वित्तीय सेवांमध्ये मोठी खरेदी

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात प्रचंड खरेदी झाली. मुख्य निर्देशांक सलग चौथ्या सत्रात मोठ्या तेजीसह बंद झाला. बहुतांश खरेदी एफएमसीजी, रिअल्टी आणि वित्तीय सेवांमध्ये झाली. एफएमसीजी निर्देशांक 3.6 टक्क्यांनी वाढला. बीएसई 5 टक्के वाढीसह सर्वाधिक वाढलेला शेअर्स ठरला आहे.

Advertisement

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1225.07 अंकांच्या वाढीसह 76917.85 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील 370.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 23,810.85 वर बंद झाला आहे.

मोठ्या कंपन्यांसोबतच, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही वाढ झाली. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वाढला. निफ्टी कॅपिटल मार्केट्स निर्देशांकाने 4.5 टक्क्यांची जोरदार वाढ नोंदवली. नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, एशियन पेंट्स हे समभाग 4 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत बंद झाले. तर पॉवरग्रिडचा शेअर 3 टक्क्यांनी घसरून तोट्यात राहिला.

जागतिक घडामोडींचा दिलासा

कच्च्या तेलाच्या किमती कमी होणे, परदेशी गुंतवणूकदारांकडून सततची खरेदी आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन भांडवली नफा कर नियमांच्या संभाव्य पुनरावलोकनाच्या अपेक्षेमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला आहे.

कच्चे तेल घसरणीचा परिणाम

सोमवारी, ब्रेंट क्रूड 7.63 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 104.77 डॉलरवर आले आणि सध्या ते प्रति बॅरल सुमारे 105.5 डॉलरवर व्यवहार करत आहे. याशिवाय, इराण आणि कतार यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठीच्या चर्चेत झालेल्या प्रगतीमुळे पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची आशा वाढली आहे. तथापि, गुंतवणूकदार 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांवर लक्ष ठेवून असतील, ज्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढू शकते.

एआय कंपन्यांमधील वाढत्या खर्चामुळे बाजाराला फायदा?

शेअर बाजारातील तेजीचे तिसरे कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कंपन्यांमधील वाढत्या खर्चाबद्दल गुंतवणूकदारांची चिंता. याचे एक उदाहरण अॅपलच्या अलीकडील तिमाही निकालांवरून समजू शकते. अॅपलने सोमवारी जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीची कामगिरी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. आयफोनची विक्री आणि सेवांमधून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाल्याने कंपनीने महसुलाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Advertisement
Tags :

.