For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्वालामुखीच्या आत फुटबॉल मैदान

06:19 AM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्वालामुखीच्या आत फुटबॉल मैदान
Advertisement

सरकारला नाही प्रवेशाची अनुमती

Advertisement

जगभरात मोठमोठ्या फूटबॉल स्टेडियम्सवर अब्जावधी रुपये खर्च केले जातात, परंतु मेक्सिकोचे एक साधारण मातीचे मैदान स्वत:च्या अनोख्यापणामुळे चर्चेत आहे. मेक्सिको सिटीच्या दक्षिणेत एका निद्रिस्त ज्वालामुखीच्या पोकळ हिस्स्याच्या मधोमध एक फूटबॉल मैदान निर्माण झाले असून त्याला फील्ड ऑफ द गॉड्स म्हटले जाते. हिरवाई अन् पर्वतांनी वेढलेले हे मैदान दर रविवारी भरून जाते, तेव्हा येथे ‘सांता सेसिलिया टेपेटलापा’ भागातील एका स्थानिक लीगचे सामने खेळले जातात.

या मैदानावर टेओका एमेच्योर लीगचे आयोजन होते, ज्यात एकूण 10 संघ खेळतात. या लीगची सर्वात खास बाब म्हणजे येथे खेळणाऱ्या प्रत्येक संघ एका भागातील एकाच परिवाराच्या लोकांचा असतो. सामना खेळण्यासाठी वयाचे कुठलेच बंधन नसल्याने येथे 15 वर्षीय मुलापासून 65 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वजण फुटबॉलमागे पळताना दिसून येतात. या खेळाकरता महिला मैदानात उतरत नाहीत, परंतु दर रविवारी त्या मोठ्या संख्येत मैदानाबाहेर उभे राहून स्वत:च्या पारिवारिक टीम्सची हूटिंग करतात आणि खेळाडूंचा उत्साह वाढवतात.

Advertisement

हा पूर्ण भाग अत्यंत चिंचोळ्या अन् उतारयुक्त उभ्या शिखरांदरम्यान आहे. येथे क्रीडामैदानासाठी कुठलीच समतल जमीन नव्हती. अशास्थितीत ग्रामस्थांनी या निद्रिस्त ज्वालामुखीच्या ख•dयाची निवड केली, कारण याच्या आतील पृष्ठभाग सर्वात सरळ होता. येथे धूळ अन् मातीने भरलेले मैदान असले तरीही याची देखभाल पूर्ण गावासाठी इज्जतीचा सवाल आहे. गावातील लोक आळीपाळीने या मैदानाची सफाई आणि दुरुस्तीचे काम करतात. प्रत्येक काम वर्गणीतून पूर्ण केले जाते आणि सरकारी मदत स्वीकारण्यास स्पष्ट नकार देण्यात येतो.

आम्ही या मैदानाची देखभाल आमच्या वतीने सर्वात चांगल्या पद्धतीने करतो आणि आमची लीग पूर्णपणे स्वत:च्या नियमांवर चालते. आम्ही सरकार किंवा नगरपालिकेकडून कुठलीच मदत घेत नाही, कारण सरकारने या मैदानावर एक रुपयाही खर्च केला तर ते येथे स्वत:चा बोर्ड लावणार आणि मालकी हक्क दर्शवू लागेल. हा पर्वत आणि मैदान पूर्ण गावाची सामूहिक संपत्ती आहे. ही आमची संपत्ती आहे आणि ती आम्हीच सांभाळू. सरकारला दूर ठेवत आम्हीच या मैदानाला स्वत:च्या मुलांसाठी वाचवू शकतो असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.