प्रशंसा करून खिसा भरणारा अवलिया
अजब व्यवसाय, परंतु कमाई सुपरहिट
लोक स्वत:चे आयुष्य सुरळीत चालावे म्हणून काही ना काही करून पैसे कमावत असतात. जे लोक शिकलेले असतात, ते ऑफिसमध्ये काम करतात. तर जे कमी शिकलेले असतात ते स्वत:च्या कौशल्यानुसार काही ना काही काम करत असतात. परंतु काही लोक अत्यंत वेगळे काम करतात, परंतु कमाई चांगली करत असतात.
एका इसमाचा कमाईचा मार्ग अत्यंत अजब आहे, परंतु लोकांना अत्यंत पसंत आहे. तो रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे कौतुक करतो आणि त्यांच्याकडून याचे शुल्क आकारतो. जपानमध्sय राहणारा हा इसम कमी वयाचा नाही. याचमुळे लोक याला अंकल प्रेज म्हणतात. हा अंकल प्रेज कुणाचेही कौतुक करण्यास तरबेज आहे.
जपानच्या फुजी टीव्हीवर सर्वप्रथम लोकांना त्याच्याविषयी रिपोर्ट पाहिला होता. 43 वर्षीय अंकल प्रेजचे खरे नाव माहिती नाही, परंतु तो तोशिगी येथे राहतो. तो स्वत:च्या आयुष्याच्या एका वळणावर जुगाराच्या व्यसनाला बळी पडला आणि स्वत:चा परिवार अन् नोकरी गमावून बसला. त्याच्या परिवाराने त्याच्यासोबतचे नाते तोडले आणि तो रस्त्यावरच राहू लागला. या झटक्यानंतर त्याचे जुगाराचे व्यसन सुटले आणि तो स्वत:च्या उपजीविकेसाठी परफॉर्मिंग आर्ट म्हणून लोकांचे कौतुक करू लागता. तो हातात एक कार्डबोर्ड घेऊन उभा राहतो आणि त्यावर ‘मी तुमची अत्यंत प्रशंसा करतो’ असे नमूद असते.
अजब, परंतु पेशा आहे...
हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही कौतुक आणि प्रोत्साहनाची गरज प्रत्येकाला असते, भले मग ते अनोळखीच का करत असेना. पूर्वी त्याच्याकडे कुणीच येत नव्हते आणि तो तास न तास उभा रहायचा. परंतु नंतर लोक त्याच्याकडे येऊ लागले. जेव्हा तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर दूर दूरवून लोक त्याला बोलावू लागले. अंकल प्रेजनुसार एका दिवशी तो सरासरी 30 लोकांचे कौतुक करतो आणि त्यातून त्याला दरदिनी साडेपाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.