For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पावसाळ्या काचेत बदलते फूल

06:37 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाळ्या काचेत बदलते फूल
Advertisement

पाऊस पडताच पांढऱ्या फुलाच्या पाकळा काचेसारख्या पारदर्शक झाल्यास हा एखाद्या कॅमेरा इफेक्टची कमाल नाही. जपानच्या पर्वतीय जंगलांमध्sय मिळणारे डिफाइलिया ग्रेयी असेच अनोखे फूल आहे. याला ‘स्केलेटन फ्लॉवर’ देखील म्हटले जाते. शुष्क हवामानात याच्या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या दिसतात, परंतु पावसानंतर याच पाकळ्या जवळपास पारदर्शक दिसू लागतात.

Advertisement

या फुलाच्या पाकळ्यांमध्sय अत्यंत छोट्या छोट्या रिकामी जागा असतात. सामान्य स्थितीत या जागांमध्ये हवा राहते. यामुळे प्रकाश पाकळ्यांना आदळून फैलावतो आणि फूल पांढरे दिसते. पाऊस पडल्यावर या रिकामी जागांमध्sय पाणी भरून जाते. यानंतर प्राकश पाकळ्यांमधून सहजपणे जाऊ लागतो आणि पाकळ्या पारदर्शक दिसू लागतात. फुल सुकल्यावर हाच बदल पुन्हा परत होतो आणि पाकळ्या पांढऱ्या दिसू लागतात. याचे थेट कारण फुलाच्या पाकळ्यांची रचना आहे. कोरड्या पाकळ्यांच्या आत हवायुक्त छोट्या छोट्या जागा असतात. हवा आणि पाकळ्यांच्या उर्वरित हिस्स्यात अंतर असल्याने प्रकाश अनेक दिशांमध्ये फैलावतो, याच कारणामुळे पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या दिसतात.

पावसाचे पाणी या जागांमध्ये भरल्यावर हे अंतर कमी होते, यामुळे प्रकाश पाकळ्यांच्या आतून अधिक सहजपणे निघू शकतो. यामुळे पांढऱ्या पाकळ्या काचेसारख्या पारदर्शक दिसू लागतात. म्हणजेच या फुलाचा पांढरा रंग अचानक गायब होत नाही. पाऊस केवळ पाकळ्यांमधून प्रकाश कशाप्रकारे आरपार जातोय हे बदलत असतो. या फुलाच्या पाकळ्या पावसाचा पहिला थेंब पडताच पारदर्शक होत नाहीत. 2023 मध्ये प्रकाशित एका वैज्ञानिक लेखानुसार हलका पाऊस सुमारे एक दिवसापर्यंत पडल्यावर पाकळ्या पारदर्शक होऊ शकतात. पाऊस थांबल्यावरही काही वेळापर्यंत पाकळ्या अशाच राहू शकतात. जेव्हा त्या पूर्णपणे कोरड्या होतात, तेव्हा त्या पांढऱ्या रंगाच्या होतात. पावसामुळे पाकळ्यांचा रंग बदलत नाही, तर त्यांची पारदर्शकता बदलते असे म्हणणे योग्य ठरेल.

Advertisement

जपानच्या जंगलांमध्ये अस्तित्व

होक्काइडो विद्यापीठानुसार डिफाइलीया ग्रेयी एक बारमाही रोप आहे. हे सुमारे 30-50 सेंटीमीटरपर्यंत उंच असू शकते. हे जपानच्या होन्शू आणि होक्काइडोपासून सखालिनपर्यंत आढळून येते. हे रोप सर्वसाधारणपणे जंगलं आणि जंगलांच्या काठांवर असलेल्या भागांमध्ये उगवते. याचे फूल जून आणि जुलैच्या आसपास दिसून येते. या रोपाला मोठी पानंही असतात, जी सुमारे 37 सेंटीमीटरपर्यंत रुंद असू शकतात. याच्या फुलात सर्वसाधारणपणे 6 पाकळ्या असतात, फुल आल्यावर यात फळही धारण होते, जे पिकल्यावर जांभळ्या रंगाचे होत असते.

स्केलेटन फ्लॉवर नाव का

पावसानंतर जेव्हा पाकळ्या पारदर्शक होतात, तेव्हा यातील नसा स्पष्टपणे दिसू लागतात. यामुळे फुल एखाद्या सांगाड्यासारखे दिसते. याचमुळे याला ‘स्केलेटन फ्लॉवर’ म्हटले जाते. केवळ विज्ञानाच्या वर्तमान वर्गीकरणात याचे स्वीकारण्यात आलेले नाव ‘पोडोफिलम ग्रेयी’ आहे. तर डिफाइलीया ग्रेयी याचे समानार्थी नाव आहे. याचमुळे दोन्ही नावे वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येऊ शकतात. या फुलाचे वैशिष्ट्या पूर्णपणे याच्या पाकळ्यांच्या रचनेशी निनगडित आहे. पावसाचे पाणी पाकळ्यांच्या आतील रिकामी जागांमध्ये शिरते आणि प्रकाश संचाराची पद्धत बदलून टाकते. याचमुळे पांढऱ्या पाकळ्या पारदर्शक दिसू लागतात. फुल पुन्हा कोरडे होताच आतील जागांमध्ये पाण्याच्या जागी हवा येते आणि पाकळ्या पुन्हा पांढऱ्या दिसू लागतात.

Advertisement
Tags :

.