For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Wai Traffic Jam | वाई-पाचगणी रस्त्यावर पर्यटकांचा महापूर; सलग सुट्ट्यांमुळे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

04:57 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
wai traffic jam   वाई पाचगणी रस्त्यावर पर्यटकांचा महापूर  सलग सुट्ट्यांमुळे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
Advertisement

                         वाई–पाचगणी मार्गावर भीषण कोंडी; सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक ठप्प

Advertisement

वाई : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे वाई-पाचगणी रस्त्यावर प्रचंड वाहतुकीमुळे चक्काजाम झाला असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. शुक्रवार ते रविवार तीन दिवस सुट्टी असल्याने वाई- सुरूर रस्त्यावर संपूर्ण दहा किलोमीटरचा रस्ता वाहनांनी गजबजून गेला लांबच्या लांब रांगा लागल्या असून सलग सुट्ट्यांमुळे मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या पाचगणी, महाबळेश्वरला वाहतुकीची कोंडी झाली होती.

वाई शहरात पार्किंगचा प्रश्न सर्वात गंभीर असल्याने लोकांची फार मोठी कुचंबना झालेली पहायला मिळाली, मिनी कोकण समजला जाणारा वाईचा पश्चिम भाग हा जैवविविधतेने नटलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. या भागात रायरेश्वर, कमळगड, केंजळगड यांच्यासह सह्याद्रीच्या उत्तुंग रांगानी नटलेला आहे. राज्य शासनाने सुध्दा गडकोट सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे, पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेले धोम व बलकवडी धरण याच भागातआहेत.

Advertisement

सलग सुट्टी असल्याने पाचगणी-महाबळेश्वरला पर्यटकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे. वाई पाचगणी रस्त्यावर तीन ते चार किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने पर्यटकांमधून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तरी याचा गांभीर्याने विचार व्हावा असे अनेकांनी जाहीर बोलून दाखविले, वाहतूक व्यवस्था योग्य करण्यात यावी गेली अनेक वर्षे नेहमीच सुरूर-ते-महाबळेश्वर रोडवर वाहतुकीची कोंडी ही नित्याची होवून बसली आहे.

सध्या सुरूर ते पोलादपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. त्यामुळे पर्यटक त्रस्त झाले असून जाहीर नाराजी बोलून दाखविली आहे. तरी संबधित विभागाने यावर त्वरित उपाय योजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या भागातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालत असतो. महाबळेश्वर बरोबरच धोम धरणावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची तोबा गर्दी असते. संपूर्ण वेळ प्रवासात गेल्याने अनेकांचा
हिरमोड होतो. तरी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशीही मागणी जोर धरत आहे.

पर्यटकांची दिवसेंदिवस होणारी गर्दी वाहतुक कोंडीस निमंत्रण देत आहे, सलग सुट्टी मिळाली की, पर्यटकांची पहिली पसंती ही पांचगणी महाबळेश्वरलाच असते, त्यामुळे पर्यटकांचा विचार समोर ठेवून रस्ते रुंदीकरणाचा विचार व्हावा असा आग्रह धरण्यात येत असून या भागातील उणिवांमुळे पर्यटक थांबण्याचे नावच घेत नाही तो त्वरित परत निघून जातो.

Advertisement
Tags :

.